मासिक पाळी दरम्यान पोट दुखीसाठी करा ‘हे’ घरघुती उपाय

मासिक पाळीदरम्यान पोट दुखणे ही समस्या अनेक स्त्रियांना असते. यावर काही घरघुती उपाय केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ती एका विशिष्ट वयापर्यंत सुरु राहते. मासिक पाळी या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरीही मासिक पाळीच्या अनेक समस्याही महिलांना असतात. ही प्रत्येक स्त्री साठी सामान्य गोष्ट असली तरीही तिला होणारा त्रास हा मात्र बरेचदा असामान्य असतो. त्यात मासिक पाळीदरम्यान पोट दुखणे ही समस्या अनेक स्त्रियांना असते (stomach pain in periods ). यावर काही घरघुती उपाय केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.

१. गरम पाण्याची बाटली किंवा हिटिंग पॅड पोटाच्या खालच्या बाजूला लावून ठेवल्यास, तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळू शकते. रात्री झोपण्यापूर्वी लक्षात ठेऊन हे हिटिंग पॅड बाजूला ठेवा.

२. पोटाच्या खालच्या बाजूला हलकं मालिश केल्यास तुम्हाला या पोटदुखीपासून सुटका मिळेल.
३. कोमट पाण्याने आंघोळ करा आणि या व्यतिरिक्त तुम्ही एरोमाथेरेपी करून मासिक पाळीपासून सुटका मिळवू शकता.

४. गरम पेय पदार्थ जसं तुम्ही पेपरमिंट टी योग्य प्रमाणात यावेळी पिऊ शकता

५. या दरम्यान तुम्ही अतिशय हलकं जेवण जेवायला हवं आणि काही काही वेळाने थोडं थोडं खायला हवं

६. जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स असायला हवेत – उदा. साबुदाणा, धान्य, फळं आणि हिरव्या भाज्या

८. थंड आणि आंबट गोष्टी खाण्यापासून यावेळी स्वतःला आवरा. तसंच साखर, मीठ, अल्कोहोल आणि कॅफीन कमी प्रमाणात खा

८. यावेळी तुम्हाला झेपतील असे व्यायाम करा आणि झोपलेले असाल तर सरळ उठा आणि मग डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला तुमचे पाय दुमडून उठा

९. नियमित चाला आणि त्याशिवाय रोज सोपे योगाभ्यास आणि ध्यान करा

१०. विटामिन बी ६, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची औषधं घ्या