fat burn in office

तुम्ही तुमच्या कार्यालयात जाताना किंवा काम करताना सुद्धा कॅलरीज(How To Burn Calories In Office) आणि चरबी सहज बर्न करू शकता. तुम्ही उभे असतानाही कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर चांगल्या स्थितीत ठेवू शकता आणि रक्तामध्ये साठलेली चरबी कमी करू शकता. आपण उभे असताना चरबी (Fat Burn In Office)कशी जाळू शकतो ते जाणून घेऊया.

    ऑफीसला(Office) जाणारे दिवसातून ८ ते १० तास काम करतात. या काळात ते एकतर शारीरिकरीत्या सक्रिय नसतात किंवा त्यांच्या ठिकाणाहून खूप कमी वेळा हलतात. अशा परिस्थितीत वजन वाढण्याची आणि अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळेच रोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र व्यायामासाठी(Exercise) आपल्या दिनक्रमात वेळ नसताना अडचण येते. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना ठेवतात.

    जर तुमच्याकडे व्यायामासाठी वेळ नसेल, तर तुम्ही तुमच्या कार्यालयात जाताना किंवा काम करताना सुद्धा कॅलरीज आणि चरबी सहज बर्न करू शकता. तुम्ही उभे असतानाही कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर चांगल्या स्थितीत ठेवू शकता आणि रक्तामध्ये साठलेली चरबी कमी करू शकता. आपण उभे असताना चरबी कशी जाळू शकतो ते जाणून घेऊया.

    ऑफीसमध्ये फॅट बर्न करण्याचे मार्ग

    • स्टँडिंग डेस्कचा वापर – जर तुम्ही तुमच्या कार्यालयात बराच वेळ बसून काम करत असाल तर तुम्ही स्टँडिंग डेस्कचा वापर करावा.स्टँडींग डेस्कमुळे शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह सुधारतो आणि आपल्याला अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत करते.
    • मल्टीटास्कींग – मल्टीटास्कींग करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ – जर तुम्ही तुमचे काम कॉन्फरन्स कॉलवर करत असाल तर ब्लूटूथ किंवा वायरलेस हेडसेट वापरा आणि चालता चालता बोला.
    • किती चाललात त्याचा रेकॉर्ड ठेवा – शक्य तितक्या दूर, कामाच्या दरम्यान ब्रेक घेऊन स्वतःला सक्रिय ठेवा. आपले स्मार्ट घड्याळ वापरा. काही मोबाईलमध्येही किती पावले चाललो याचा रेकॉर्ड ठेवता येतो.
    • लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा – लिफ्टऐवजी जिन्याचा वापर केलात तर तुमचं तेवढ चालण होईल. अधून मधून जिन्यावरून खाली उतरून गेलात आणि परत वर आलात तर कॅलरी बर्न होण्यास मदत होईल.