अशी वाढवा लहान मुलांची प्रतिकारक शक्ती

लहान मुले आजारी पडताना दिसतात. वयाने लहान असल्याने मुले नेमके काय होतंय हेही सांगू शकत नाहीत. अशा स्थितीत मुलांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे.

    लहान मुलांच्या शरीरामध्ये रोग प्रतीकारक बऱ्याचदा कुमकुवत असलेली आढळून येते. त्यामुळे सातत्याने लहान मुले आजारी पडताना दिसतात. वयाने लहान असल्याने मुले नेमके काय होतंय हेही सांगू शकत नाहीत. अशा स्थितीत मुलांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे.

    – मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा ज्यूस , उकडलेला बटाटा यांचा आहार समावेश करावा.

    – लहान मुलांची व्यवस्थितीत झोप होईल याकडे लक्ष द्या, सर्वसाधारणपणे आठ ते दहा तासांची पुरेपूर झोप होईल यासाठी प्रयत्न करा.

    – जी लहान मुले आईचे दूध पीत असलयास त्यांना नियमितपणे स्तनपान करण्यास विसरू नका.  कारण आईच्या दुधात अँटीबॉडी, प्रोबायोटिक्स, प्रथिन, वसा, साखर, इत्यादी आढळतात, जे मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

    – लहान मुलांना दिली जाणारी सर्व लसीकरणे वेळेत द्या.