face yoga

फेस योगा(Face Yoga) नियमित केल्यामुळे नाक,गाल, ओठ या अवयवांची त्वचा सैल पडत नाही. वाढत्या वयाचा परिणाम रोखायला फेस योगाची मदत होते.

  योगासनामुळे मन आणि शरीर दोन्हीही निरोगी राहते.(International Yoga Day 2021) तर फेस योगामुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. फेस योगामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. चेहऱ्याची चमक टिकून राहते. तसेच चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात.

  फेस योगा(Face Yoga) नियमित केल्यामुळे नाक,गाल, ओठ या अवयवांची त्वचा सैल पडत नाही. वाढत्या वयाचा परिणाम रोखायला फेस योगाची मदत होते. जर तुम्हालाही चिरतरुण चेहरा हवा असेल तर रोज फेस योगा कराच.फेस योगाचे प्रकार(Types Of Face Yoga) आपण जाणून घेऊयात.

  १) फिश पोज(Fish Pose)

  fish pose

  फिश पोजमध्ये आपले ओठ आणि गाल आतल्या बाजूला ओढा. काही सेकंद अशी क्रिया करा. तीन वेळा फिश पोज रिपीट करा. फिश पोजमध्ये तोंडाचा आकार माश्यासारखा दिसतो म्हणून याला फिश पोज म्हणतात.

  २) जीभ पोज(Tongue Pose) 

  tongue pose

  जीभ पोजसाठी सगळ्यात आधी जीभ जितकी शक्य आहे तितकी बाहेर काढा. ३० सेकंद या अवस्थेत थांबा. या पोजमुळे डार्क सर्कल्स दूर व्हायला मदत होते. तसेच या पोजमुळे सुरकुत्या पडत नाहीत.

  ३) माऊथवॉश टेक्निक योग(Mouthwash Technique)

  mouthwash technique

  हा एकदम सोपा प्रकार आहे. तोंडात पाणी भरल्यावर जसं तोंड फुगत तसं फुगवा. तोंडात हवा भरून गाल हलवा. दोन- तीन वेळा असं करा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त फॅट्स कमी होतील.

  ४)लिप पूल(Lip Pull)

  lip-pull

  लिप पूल योगामुळे चिकबोन आणि जॉ लाईन चांगली होते. तसेच चेहऱ्यावर चमक येण्यासाठी ही पोज उपयुक्त ठरते. या पोजसाठी खालचा ओठ शक्य असेल तितका बाहेर काढा. काही सेंकद ही क्रिया करा.