आयुर्वेदाने करा वजन कमी; वापरा ‘या’ सहज आणि सोप्या टिप्स

आयुर्वेदाच्या मदतीने फक्‍त वजन कमी होईल असे नाही, तर जीवनशैलीतच सकारात्मक बदल घडतील. साधा आहार आहारातील साधेपणा यामध्ये जगण्यासाठी खाणे यावर भर दिलेला असतो.

  तंदुरुस्ती आणि दीर्घायुष्य दोन्ही प्रदान करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद निसर्गाच्या जवळ जाण्यास आणि साधे आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देते. स्थूलपणा किंवा वजन जास्त असणे (Lose weight) ही समस्या आयुर्वेदानुसार एक आजारच आहे.

  आयुर्वेदाच्या मदतीने या आजारावर उपाय करताना ही गोष्ट पक्‍की ध्यानात ठेवावी लागेल ती म्हणजे आयुर्वेदात कोणतेही शॉर्टकट किंवा चोरटे मार्ग नाहीत. थोडक्यात, आयुर्वेदाच्या मदतीने फक्‍त वजन कमी होईल असे नाही, तर जीवनशैलीतच सकारात्मक बदल घडतील. साधा आहार आहारातील साधेपणा यामध्ये जगण्यासाठी खाणे यावर भर दिलेला असतो.

  लोकांनी साधा; पण पौष्टिक आहार घ्यावा, ताजे-कमी तेलातील शिजवलेले अन्‍न खावे, असा सल्ला दिला जातो. कोणत्याही पथ्याहारात महत्त्वाची गोष्ट असते ती आहाराप्रति द‍ृष्टिकोन बदलणे. पथ्याहार घेताना आपल्या मेंदूला एक शिस्त लागली पाहिजे, जेणेकरून अनारोग्यकारी आहार घेण्याची मनाची इच्छा रोखून धरता येते. सुपात असणारे आहार घटक घेण्यास सुचवले जाते.

  तांदळाची भरड, उकडलेल्या भाज्या, भाज्यांचे सूप, तसेच गहूवर्गीय पदार्थ खाण्यास सांगितले जाते. न्याहारी न्याहारीतही विविध पदार्थांचा समावेश करता येऊ शकतो. मात्र, तळलेले, तेलकट-तूपकट पदार्थ वर्ज्य करायला सांगितले जातात. उदा., वाफवलेली इडली किंवा पारंपरिक केरळी वाफवलेली केळी असे पदार्थ खावेत. पापडही तळण्यापेक्षा तो भाजून खावा. प्रथिनयुक्‍त पदार्थ शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते, त्यासाठी विविध धान्ये ही प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. सोयाबीन, विविध डाळी जसे चणाडाळ, हिरव्या मुगाची डाळ, उडीदडाळ खायला हवी.

  पक्‍वान्‍न आणि गोड पदार्थ फक्‍त साखरेचा चहा घेण्यास परवानगी असते. इतर कोणतेही पक्‍वान्‍न किंवा गोड पदार्थ खाऊ नयेत. हातसडीचा जो तांदूळ आहारात घेतो, त्यामुळे रक्‍तातील साखरेची पातळी योग्य राखली जाते. त्यामुळे पक्‍वान्‍न किंवा गोड पदार्थांविषयी आसक्‍ती थोडी लांबच ठेवावी लागेल.

  पेय पदार्थ दह्यापेक्षाही ताक घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याव्यतिरिक्‍त चहा आणि कॉफी घेण्यास हरकत नाही. रोज किमान दीड लीटर कोमट पाणी प्यायला हवे, त्यामुळे भूक थोडी थांबवली जाते. शिवाय, शरीर ओलसर राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कोमट पाणी पोटात अधिक वेळ राहत असल्याने भूक थोडी उशिरा लागते. आवडत्या गोष्टींपासून लांब राहा आपल्याला जेवणात एखादी गोष्ट जास्तच प्रिय असू शकते. उदा., एखाद्याला भात जास्त आवडतो, तर ते कमी करून पोळी-भाकरी जास्त खा आणि भात कमी खा किंवा पोळी-भाकरी अतिप्रिय असेल, तर ते कमी खाऊन भात थोडा अधिक खा. थोडक्यात, आवडीचे पदार्थ भरपूर खाण्यापेक्षा कमी आवडीचे पदार्थ खावेत.