antibodies can not give you an confirm assurance to avoid reinfection of corona says expert nrvb

हा इशारा दिलाय प्रा. जीन जेकस मुयेम्बे टॅम्फम यांनी. जगभरात धुमाकूळ घातलेल्या इबोला व्हायरसचा शोध प्रा. टॅम्फम यांनीच लावला होता. १९७६ सालीच त्यांनी इबोला व्हायरसवर संशोधन केले होते. सध्या लंडन आणि युरोपातील देशांमध्ये नव्या कोरोना व्हायरसची लागण होत असताना टॅम्फम यांनी केलेलं हे विधान विशेष महत्त्वाचं आहे.

जगात सध्या असे काही विषाणू आहेत, ज्यांचा संसर्ग कोरोना विषाणूपेक्षा कितीतरी अधिक भयंकर आणि गंभीर असू शकतो, असा इशारा देण्यात आलाय. या विषाणूंच्या साथी अफ्रिकेच्या उष्ण कटिबंधातील वनांच्या क्षेत्रातून सुरू होऊ शकतात आणि त्यानंतर त्यांचा पूर्ण जगात फैलाव होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आलाय.

हा इशारा दिलाय प्रा. जीन जेकस मुयेम्बे टॅम्फम यांनी. जगभरात धुमाकूळ घातलेल्या इबोला व्हायरसचा शोध प्रा. टॅम्फम यांनीच लावला होता. १९७६ सालीच त्यांनी इबोला व्हायरसवर संशोधन केले होते. सध्या लंडन आणि युरोपातील देशांमध्ये नव्या कोरोना व्हायरसची लागण होत असताना टॅम्फम यांनी केलेलं हे विधान विशेष महत्त्वाचं आहे.

आपण सध्या अशा जगात राहत आहोत, जिथं भयंकर आणि जीवघेण्या विषाणूंचं अस्तित्व आहे. इबोलाचा शोध लावल्यानंतर टॅम्फम यांनी असे भयंकर विषाणू शोधण्याच्या कार्याला स्वतःला वाहून घेतलंय. जगातील वेगवेगळ्या प्रांतातील हवामान, तिथले जीवजंतू आणि त्यातून तयार होऊ शकणारे संभाव्य विषाणू यावर सध्या ते संशोधन करत आहेत.

युरोपातील नव्या कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे जगभरात पुन्हा एकदा घबराट निर्माण झालीय. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीला स्थगिती दिलीय.