नाकातले केस उपट असाल; तर होऊ शकतात गंभीर परिणाम

नाकातले केस आपल्या शरीराचे रक्षक म्हणून काम करतात. नाकात धूळ आणि कचरा जाण्यापासून हे केस रोखतात. त्यामुळे आपल्याला श्वासासंबंधीत आजार शक्यतो होत नाहीत. नाकातील केस नाकपुड्यांना चिकटून असतात.

  सुंदर दिसणे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतो. मात्र अनेकांसाठी नाकातून डोकावणारे केस हे सौंदर्याला बाधा निर्माण करणारे ठरतात. यामुळे काही जण ते उपटून टाकतात. मात्र केस उपटण्याच्या या सवयीमुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे नाकातील केस काढत असाल तर त्याचे परिणाम जाणून घ्या.

  नाकातले केस आपल्या शरीराचे रक्षक म्हणून काम करतात. नाकात धूळ आणि कचरा जाण्यापासून हे केस रोखतात. त्यामुळे आपल्याला श्वासासंबंधीत आजार शक्यतो होत नाहीत. नाकातील केस नाकपुड्यांना चिकटून असतात. काहीवेळा हे केस नाकातून बाहेर डोकावतात ज्यामुळे ते कापले जातात किंवा वॅक्स करून काढले जातात. मात्र त्याने आपल्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो.

  संसर्गाचा धोका
  नाकातले केस कापल्याने किंवा वॅक्स केल्याने संसर्ग होऊ शकतो. नाकातील हेअर फॉलिकल ओपन झाले तर सगळ्या प्रकारचे धूळ, किटाणू आणि घाण नाकातील अत्यंत सूक्ष्म अशा छिद्रांमध्ये जमा होऊ शकतात, यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

  अर्धांगवायूचा झटका
  नाकाचे केस काढल्याने मेंदूतील रक्तवाहिन्यांचा संसर्ग होऊ शकतो. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर संसर्गाचा धोका वाढू शकतो. रक्त पुरविणाऱ्या वाहिन्यांमुळे संसर्ग होऊन मेंदूवर त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्या व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते. काहीवेळेस यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.