कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे अनेकांची चिंता वाढली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहे. सध्या लसीकरण हा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एकमेव अस्त्र आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने संक्रमित करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता कोविडच्या धोक्यापासून वाचण्यासाठी एक्सपेरिमेंटल च्यूइंग गम समोर आले आहे(Science Fact! Eat chewing gum and avoid in corona).

च्युइंग गम 95 टक्के कोविड पार्टिकल्स मानवी तोंडातच ट्रॅप करते. ज्यामुळे हा आजार शरीरात पसरण्यापासून रोखण्यास मदत मिळते असा वैज्ञानिकांचा दावा आहे. एका स्टडीनुसार, हे च्युइंग गम एका नेटसारखे काम करते. त्यात कोरोना व्हायरसचे विषाणू ट्रॅप होतात. त्यामुळे सालिव्हा व्हायरसच्या पसरण्याला मर्यादित करते. जेव्हा संक्रमित लोक बोलतात, श्वास घेतात आणि कफ करतात तेव्हा आजार पसरण्याचा धोका असतो मात्र हे च्युइंग गम या प्रसाराला रोखते. स्पेशल च्यूइंग गममध्ये ACE2 Protein असते. जे पेशीच्या पृष्ठभागापर्यंत जाते.
विषाणू पेशींना संक्रमित करतो परंतु अलीकडेच केलेल्या प्रयोगात असे आढळले की, जेव्हा विषाणूचे पार्टिकल्स च्युइंग गमच्या ACE2 ला मिसळतात तेव्हा व्हायरल लोड कमी होतो. जेव्हा या च्यूइंग गमच्या नमुन्याची चाचणी केली गेली तेव्हा यातील व्हायरल लोड जवळपास 95 टक्के नष्ट झाला होता.
रिपोर्टप्रमाणे, तुम्हाला या च्यूइंग गमची चव तुम्ही खाता त्या गमसारखीच येईल. सामान्य तापमानात हे च्यूइंग गम जास्त काळ साठवू शकता. हे च्यूइंग गम चघळल्याने ACE2 प्रोटीन रेणूंना नुकसान होत नाही. याचा वापर लाळेतील व्हायरल लोड कमी करण्यासाठी होतो. लसीसोबतच हे च्यूइंग गम रुग्णांना फायदा पोहचवेल. ज्या देशात अद्याप लस उपलब्ध झाली नाही किंवा परवडणारी नाही त्याठिकाणी याचा जास्त फायदा होईल असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.