नवीन संशोधनाचा धक्कादायक दावा, कोरोना पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता खराब करू शकतो?

कोरोनाच्या (Corona) सर्व बातम्यांदरम्यान दोन धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. एकामध्ये, जिथे ओमायक्रॉनचे डेल्टासारखे धोकादायक वर्णन केले गेले आहे, तर दुसर्‍या निष्कर्षात कोविड-१९ चा शुक्राणूंच्या संख्येवर होणारा परिणाम (Effect On Sperm Count) समोर आला आहे.

  ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नवीन प्रकाराने जगभरात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. भारतात आतापर्यंत Omicron चे २०० रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या सर्व बातम्यांदरम्यान दोन धक्कादायक निष्कर्ष (Shocking Conclusion) समोर आले आहेत. एकामध्ये, जिथे ओमायक्रॉनचे डेल्टासारखे धोकादायक वर्णन केले गेले आहे, तर दुसर्‍या अभ्यासात कोविड-१९ चा शुक्राणूंच्या संख्येवर होणारा परिणाम समोर आला आहे.

  आतापर्यंत, दक्षिण आफ्रिकेतील डेटानुसार ओमायक्रॉन डेल्टा पेक्षा कमी धोकादायक असल्याचे मानले जात होते, परंतु इम्पीरियल कॉलेज लंडन (Imperial College London) च्या नवीन अभ्यासाने या दाव्याचे पूर्णपणे खंडन केले आहे. UK च्या संशोघनानुसार, Omicron हे डेल्टासारखेच धोकादायक आहे आणि त्याचे परिणाम तितकेच भयावह आहेत. त्याच वेळी, फर्टिलिटी आणि स्टेरिलिटीमध्ये (Fertility and Sterility) प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनात असे म्हटले आहे की व्हायरस आणि पुरुष प्रजनन क्षमता यांच्यात खोल संबंध आहे. संशोधकांना आढळले आहे की पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर कोविड-१९ चा दीर्घकाळ प्रभाव पडतो.

  Omicron संसर्ग कमी गंभीर नाही

  इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी ओमिक्रॉन संसर्ग असलेल्या ११,३२९ रुग्णांची तुलना इतर प्रकारांनी संक्रमित झालेल्या जवळपास २००,००० लोकांशी केली. अभ्यासातून असे दिसून आले की ओमायक्रॉन प्रकार डेल्टापेक्षा कमी गंभीर नाही. ते कमी गंभीर असल्याचा कोणताही भक्कम पुरावा आतापर्यंत मिळालेला नाही. या संशोधनात लक्षणे दिसल्यानंतर पॉझिटिव्ह लोकांचे प्रमाण आणि रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे प्रमाण यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

  Omicron सह पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता ५.४ पट

  संशोधनात असे दिसून आले की दोन डोसनंतर ओमायक्रॉन विरूद्ध लसीची प्रभाविता ० ते २० टक्क्यांनी वाढली. बूस्टर शॉट नंतर, त्याची प्रभाविता ५५ टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत वाढली. अहवालानुसार, ओमायक्रॉनचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता डेल्टा असलेल्या रुग्णांपेक्षा ५.४ पट जास्त आहे. आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या मते, SARS Cove-2 च्या पहिल्या प्रकाराने ६ महिन्यांत दुसऱ्या संसर्गापासून ८५ टक्के संरक्षण दिले. संशोधकांचे म्हणणे आहे की ओमायक्रॉन री-इन्फेक्शनपासून संरक्षण १९ टक्क्यांपर्यंत कमी करते.

  कोविड-१९ नंतर शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गतिशीलता झाली कमी

  पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गतिशीलता कमी करण्यासाठी कोविड-१९ जबाबदार आहे. संशोधकांना आढळले आहे की, कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता अनेक महिने खराब राहते. संशोधकांना असेही आढळले आहे की, वीर्य स्वतः इतके संसर्गजन्य नव्हते. कोरोनामधून बरे झाल्यानंतर महिनाभरात ३५ पुरुषांच्या नमुन्याचा अभ्यास करण्यात आला. असे आढळून आले की, शुक्राणूंची गतिशीलता ६० टक्के आणि शुक्राणूंची संख्या ३७ टक्क्यांनी कमी झाली आहे.

  बाळाची इच्छा असलेल्या कपल्सना धोक्याचा इशारा

  बाळाची प्लॅनिंग करू इच्छिणाऱ्या कपल्ससाठी, संशोधकांनी धोक्याचा इशारा दिला आहे की कोविड-१९ संसर्गानंतर शुक्राणूंची गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.