कोरोनानंतरही धूम्रपान आणि मद्यपान करताय?; मग आधी हे वाचा

एव्हॅस्कूलर नेक्रोसिसवर स्टेजनुसार उपचार केले जातात.  सुरवातीच्या काळात केवळ ओरल मेडिसीन आणि स्ट्रेचिंग एक्सरसाईजने लाभ मिळतो.

  गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनामुळे (corona) लाखों लोकांचा जीव गेला आहे. त्याचवेळी कोरोनातून बरे झालेल्या लोकांत अनेक आजार उदभवले आहेत. काही दिवसांपूर्वी म्यूकरमायकोसिसने        mucormycosis) हाहाःकार माजवला होता. त्याचवेळी मुंबईत काही दिवसांपासून एव्हॅस्कूलर नेक्रोसिस म्हणजेच ‘बोन डेथ’चे काही प्रकरणे समोर आली.

  आगामी काळात अशा रुग्णांची संख्या वाढू शकते. हाडाचा रक्तपुरवठा ठरलेला असतो. या माध्यमातून ऑक्सिजन आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्त्व पुरवले जात असतो. जर एखाद्या कारणांमुळे रक्तपुरवठ्यात अडचण आली तर हाडाचा तो भाग हळूहळू कमकुवत होवू लागतो. यात पॅचेसप्रमाणे बोन टिश्यूची डेथ होऊ लागते. यास एव्हॅस्कूलर असे म्हणतात.

  आजारपणाचे कारण
  बोन डेथची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजेच कोविड रुग्णात शरीरात रक्तांच्या गाठी होण्याच्या शक्यता राहते. त्यामुळे हृदयविकार, ब्रेन ऍटॅक, पॅरालिसिस, किडनी किंवा आतडय़ात अडचणी निर्माण होतात. या भागातील रक्ताचा पुरवठा थांबतो आणि हे अवयव काम करण्याचे थांबते. दुसरे म्हणजे कोविडच्या सुमारे 70 ते 80 टक्के गंभीर रुग्णांना स्टेरॉइड दिले जाते. गंभीर रुग्णांच्या फुफ्फुसात सूज किंवा इंफ्लेमेशन होऊ लागल्याने रुग्णाला हाय डोस दिले जातात. त्यामुळे कोरोनातून बरे होण्यास मदत मिळते.

  हे औषध इम्यून सिस्टिमला कमकुवत करते आणि बोन टिश्यू तयार होऊ देत नाही. रुग्णांच्या शरात एव्हॅस्कूलर नेक्रोसिससारखे अनेक साईड इफेक्ट होऊ लागतात. स्टेरॉइड घेतल्यानंतर 6 ते 8 महिन्यांत किंवा दोन वर्षाच्या आत त्याचे लक्षणे दिसतात.

  जोखीम : स्टेरॉईडचा वापर करण्याबरोबरच धूम्रपान किंवा अल्कोहोल घेणार्यांत त्याची जोखीम अधिक राहते.

  कोठे परिणाम होतो? एव्हॅस्कूलर नेक्रोसिसच्या धोका हा शरिरातील काही भागातील हाडांना अधिक राहतो. जसे की हिप बॉल, फीमर बोन, अंगठय़ाखालील हाड, पायाखालचा एक तृतियांश भाग, खांदा, गुडघ्यातील हाड या ठिकाणांवर नेक्रोसिसचा परिणाम होवू शकतो.
  यात सर्वात कॉमन आजार म्हणजे मांडीतील हाड म्हणजे फीमर बोन. 50 ते 60 टक्के प्रकरणात एव्हॅस्कूलर नेक्रोसिस हे हिप बॉलवर परिणाम करते.

  प्रमुख लक्षणे : एव्हॅस्कूलर नेक्रोसिसमुळे संबंधित ठिकाणी सूज येते आणि दुखणे येते. चालण्यासही अडचणी येतात. जमिनीवर बसणे किंवा व्यायाम करतानाही त्रास होतो. जॉइंटमध्ये आर्थरायटिंस होतो. म्हणजेच जॉइंटस खराब होतात.

  उपचार : एव्हॅस्कूलर नेक्रोसिसवर स्टेजनुसार उपचार केले जातात.  सुरवातीच्या काळात केवळ ओरल मेडिसीन आणि स्ट्रेचिंग एक्सरसाईजने लाभ मिळतो. जर रुग्णांच्या स्थितीत बदल झाला नाही तर हाडाचे ऑपरेशन करावे लागते.

  खबरदारीः सध्या एव्हॅस्कूलरची प्रकरणे खूपच कमी आहेत. परंतु तज्ञांच्या मते, त्याबाबत कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. स्टेरॉईडचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे. अल्कोहोल आणि स्मोकिंग बंद करावे.