स्‍मृतिभ्रंश आजारावरील उपचारांसाठी KEM रुग्‍णालयात खास मेमरी क्‍ल‍िन‍िक; भविष्यात काळजी केंद्रात होणार रूपांतर

सतत विस्‍मरण होणे म्‍हणजे स्‍मृती शक्‍ती कमी होत जाणे, त्‍यातून दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होणे हा स्‍मृतिभ्रंश आजार आहे. त्‍यास डिमेन्‍श‍िया किंवा अल्‍झायमर या नावानेही ओळखले जाते. मेंदूतील संरचनेमध्‍ये झालेल्‍या बदलामुळे हा आजार होवू शकतो. प्रामुख्‍याने वाढत्‍या वयामध्‍ये हा आजार दिसून येतो. महत्त्वाची माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होणे, नवीन माहिती प्राप्‍त करता न येणे, नावे लक्षात ठेवताना किंवा शब्द आठवण्‍यात अडचण येणे, सतत विस्‍मरण होवून दैनंदिन कामांमध्ये गैरसोय होणे, वागणूक किंवा व्यक्तिमत्वात बदल होणे, दैनंदिन ओळखीच्या परिसरातही हरवणे आणि अशी साधर्म्‍य दाखवणारी इतर लक्षणे दिसू लागतात.

    मुंबई : स्‍मृतिभ्रंश अर्थात सातत्‍याने विस्‍मरण होण्‍याचा आजार जडलेल्‍या रुग्‍णांवरील वैद्यकीय उपचारांसाठी पालिकेच्‍या केईएम रुगणालयात मेमरी क्‍ल‍िन‍िक सुरु करण्‍यात आले आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त सुरेश काकाणी यांच्‍या हस्‍ते या वैद्यकीय सेवेचे लोकार्पण करण्‍यात आले.

    सध्‍या बाह्य रुग्‍णसेवा तत्‍त्‍वावर ही उपचार पद्धती उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. भविष्‍यात त्‍याचे काळजी केंद्रामध्‍ये रुपांतर करण्‍याचे नियोजन असल्‍याची माहिती या लोकार्पण प्रसंगी सुरेश काकाणी यांनी दिली. यावेळी केईएम रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. हेमंत देशमुख, विभागप्रमुख डॉ. संगीता रावत आदी उपस्थित होते. एखाद्या गोष्‍टीचे विस्‍मरण होणे प्रत्‍येकाच्‍या बाबतीत घडते.

    मात्र, सतत विस्‍मरण होणे म्‍हणजे स्‍मृती शक्‍ती कमी होत जाणे, त्‍यातून दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होणे हा स्‍मृतिभ्रंश आजार आहे. त्‍यास डिमेन्‍श‍िया किंवा अल्‍झायमर या नावानेही ओळखले जाते. मेंदूतील संरचनेमध्‍ये झालेल्‍या बदलामुळे हा आजार होवू शकतो. प्रामुख्‍याने वाढत्‍या वयामध्‍ये हा आजार दिसून येतो. महत्त्वाची माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होणे, नवीन माहिती प्राप्‍त करता न येणे, नावे लक्षात ठेवताना किंवा शब्द आठवण्‍यात अडचण येणे, सतत विस्‍मरण होवून दैनंदिन कामांमध्ये गैरसोय होणे, वागणूक किंवा व्यक्तिमत्वात बदल होणे, दैनंदिन ओळखीच्या परिसरातही हरवणे आणि अशी साधर्म्‍य दाखवणारी इतर लक्षणे दिसू लागतात.

    यातून व्‍यक्‍ती म्‍हणून कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय येऊ लागतात. असे लक्षणीय बदल होवून बिघडत जाणारे दैनंदिन जीवन किंवा कामकाज हे चिंताजनक ठरू लागते. स्‍मृति‍भ्रंश हा आजार मेंदूवर परिणाम करणाऱ्या रोगांमुळे होऊ शकतो. काही अपवादात्‍मक प्रसंगी पौष्टिक आहार किंवा जीवनसत्त्वाची कमतरता, अंतःस्रावी विकार, इलेक्ट्रोलाइट असंतुलन, संक्रमण, औषधांचा विपरित परिणाम किंवा मानसशास्त्रीय परिस्थिती यासारख्या घटकांमुळे देखील हा आजार जडण्‍याची शक्‍यता असते.

    या आजाराचे एकूण स्‍वरुप पाहता, वृद्धत्‍वाकडे झुकलेल्‍या वयोगटामध्‍ये बहुतांशी स्‍मृतिभ्रंश आढळून येतो. या आजाराची लक्षणे दिसू लागताच वेळीच योग्‍य औषधोपचार व काळजी याआधारे नियंत्रित करता येतो.भारतामध्‍ये एकूण लोकसंख्येच्या सुमारे १० टक्‍के नागरिक हे वृद्ध (६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे) आहेत. महाराष्‍ट्रात अंदाजे ५ लाख २७ हजार वृद्ध नागरिक हे स्मृतिभ्रंशाने ग्रस्‍त आहेत. वाढत्या आयुर्मानामुळे, स्‍मृतिभ्रंश ग्रस्‍त रुग्णांची संख्या सन २०३० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्‍वाभाविकच स्‍मृतिभ्रंशाचे वाढते प्रमाण हे वृद्ध रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील त्रासदायक ठरु लागते. त्‍यातच, स्मृतिभ्रंश आजार आणि त्‍याच्‍या रुग्‍णांना समजून घेण्यासाठी, अशा रुग्‍णांवर करावयाचे वैद्यकीय उपचार व त्‍यांची काळजी याबाबतच्‍या सामाजिक जाणीवेमध्‍ये मोठी कमतरता आढळून येते.

    या सर्व बाबी लक्षात घेता,महानगरपालिका प्रशासनाने परळ स्थित राजे एडवर्ड स्‍मारक (केईएम) रुग्‍णालयात मेमरी क्लिनिक सुरु केले आहे. या केंद्रामध्‍ये स्‍मृतिभ्रंश ग्रस्‍त रुग्‍णांवर बाह्य सेवा तत्‍वावर उपचार करता येणे शक्‍य होणार आहे. मेमरी क्‍ल‍िन‍िक हे औषधोपचार देण्‍यासह स्‍मृतिभ्रंशावरील उपचारासाठी इतर वैद्यकीय पद्धतींचा अवलंब देखील करणार आहे. स्मृतिभ्रंशांच्या रुग्‍णांना एकाच ठ‍िकाणी सर्व वैद्यकीय सेवा मिळाव्‍यात या दृष्‍ट‍िने त्‍याचे योग्‍य निदान, मूल्यमापन आणि व्यवस्थापन हे सर्व या मेमरी क्‍ल‍िन‍िक मधून उपलब्‍ध करुन दिले जाणार आहे. केईएम रुग्‍णालयाच्‍या मेंदूविकारशास्‍त्र विभागाद्वारे हे क्‍ल‍िन‍िक सुरु करण्‍यात आले आहे.