
तंदुरी रोटी मैद्यापासून बनविली जाते. मैदा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवते. मैद्यात ग्लायसेमीक इंडेक्स जास्त असतो. ज्याच्यामुळे मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो.
हॉटेल, रेस्टॉरेण्टंमध्ये गेल्यावर चवीने खाल्ली जाणारी तंदुरी रोटी (Tandoori bread) तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते (harmful to health). त्यामुळे आजारी पडायचे नसेल तर सावध व्हा आणि तंदुरी रोटी खाणे टाळा. तंदुरी रोटी खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. तंदुरी रोटी ही मैद्यापासून बनवली जाते आणि ती बनवण्याची पद्धतही थोडी वेगळी असते. ही तंदुरी रोटी खाणे धोकादायक ठरू शकते.
तंदुरी रोटी सातत्याने खात असाल तर ती सवय सोडून द्या. तंदुरी रोटी प्रमाणात खावी त्याचा अतिरेक केल्यास ती त्रासदायक होऊ शकते आणि अनेक आजारांना आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे तंदुरी रोटी कमी खा किंवा ती खाणेच बंद करा.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते
तंदुरी रोटी मैद्यापासून बनविली जाते. मैदा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवते. मैद्यात ग्लायसेमीक इंडेक्स जास्त असतो. ज्याच्यामुळे मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी तंदुरी रोटी खाऊच नये. तर निरोगी लोकांनी तंदुरी रोटी खाण्याचे प्रमाण कमी करावे किंवा खाऊच नये.
हृदयाचा त्रास होऊ शकतो
तंदुरी रोटी मधुमेहींबरोबरच हृदयासाठीही धोकादायक आहे. तंदुरी रोटी ही मैद्यापासून बनवली जाते आणि मैदा हा हृदयासाठी अजिबात चांगला नाही. त्यामुळे ही रोटी खाल्ल्याने हृदयाविकाराच्या तक्रारी वाढतात.
त्यामुळे ज्यांना हृदयविकार असतील त्यांनीही तंदुरी रोटी खाऊच नये. जर तुम्हाला तंदुरी रोटी खूप आवडते आणि तुम्ही ती खाणे सोडू शकत नाही. तर तुम्ही गव्हापासून बनलेली तंदुरी रोटी खाऊ शकता.