केरळमध्ये आढळला पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण; घाबरण्याचे कारण नाही

केरळच्या कोल्लम येथे मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. टीव्हीएम मेडिकल कॉलेजच्या एक रुग्णामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. त्यानंतर चाचण्या केल्या असता मंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले. देशात पहिला रुग्ण आढळला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

    कोल्लम : मागील काही दिवसांपासून मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे. आता केरळच्या कोल्लममध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या (Kerala) आरोग्यमंत्री वीना जॉर्ज (Heath Minister Veena George) यांनी ही माहिती दिली.

    केरळच्या कोल्लम येथे मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. टीव्हीएम मेडिकल कॉलेजच्या (TVM Medical College) एक रुग्णामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. त्यानंतर चाचण्या केल्या असता मंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले. देशात पहिला रुग्ण आढळला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. रुग्णाच्या आई-वडिलांना तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.

    वीणा जॉर्ज म्हणाल्या, परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला ताप आणि संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर पुरळ आले आहेत. त्यानंतर रुग्णाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (National Institute of Virology)  येथे पाठवले. ज्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसली. तो व्यक्ती यूएईमधील (UAE) मंकीपॉक्सची लागण झालेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला होता.