कडक ऊन्हाळा वाढतोय, उष्माघातामध्ये घ्या अशी काळजी

उन्हाळ्याचा दाह जाणवायला आता सुरूवात झाली आहे. उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. त्यामुळे उष्णतेचे अनेक विकार सुरू होतात. म्हणून वेळीच काळजी घ्यावयास हवी. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीरातील पाणी वाढवले पाहिजे.

    शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.

    उपाय-

    १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.

    २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.

    ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.

    ४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.

    ५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.

    ६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.

    ७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.

    ८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.

    ९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.

    १०) प्रत्येक काम सावकाशच करा.

    ११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.

    १२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.

    १३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.

    १४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.

    १५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.

    १६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.

    १७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.