भात शिजवताना करत असाल ही चूक; तर लगेच व्हा सावध!

अहवालानुसार, विद्यापीठ संशोधकांनी तांदूळ बनवण्याच्या तीन पद्धतींचा अभ्यास केला. त्यापैकी रात्रभर किंवा 3-4 तास पाण्यात भिजविलेले तांदूळ बनविण्याची पद्धत सर्वांत फायदेशीर असल्याचे दिसून आले. संशोधकांनी पहिल्या पद्धतीमध्ये दोन तृतीयांश पाण्यात एक भाग तांदूळ शिजवला.

  भारतात सर्वांत जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय अन्न म्हणजे तांदूळ (Rice). तांदळापासून बनविलेला भात किंवा इतर आणखी पदार्थ भारतात खूप प्रसिद्ध आहेत. भातदेखील वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो, जसे बिर्याणी, पुलाव, मसाला, टोमॅटो राईस, गोड भात इत्यादी. प्रत्येक घरात आठवड्यातून एकदा तरी तांदूळ बनवला जातो. तेच कोकणात किंवा भारताच्या दक्षिणात्य भागात तांदळाचे पदार्थ खाले जातात. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की चुकीच्या पद्धतीने तांदूळ शिजवल्यास कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

  तांदूळ बनविण्याचा योग्य मार्ग एका संशोधनातून उघड झाला. यामध्ये तांदूळ योग्य प्रकारे बनवून कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कसा कमी होतो हे संशोधनात सांगितले आहे.

   योग्य मार्ग कोणता?
  इंग्लंडमधील क्विन्स युनिर्व्हसिटी बेलफिस्टच्या संशोधकांनी तांदूळ बनवण्याच्या योग्य पद्धतीबद्दल सांगितले होते. त्यांच्या मते, तांदूळ बनवण्यापूर्वी तांदूळ रात्रभर किंवा किमान 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवावा. यानंतरच तांदूळ शिजवा. यामुळे, कर्करोग आणि हृदयरोगास कारणीभूत असलेले तांदळातील विष 80 टक्क्यांपर्यंत कमी होते. संशोधकांच्या मते, जमिनीत इंडस्ट्रियल टॉक्सिन्स आणि कीटकनाशकांची उपस्थिती तांदळाला दूषित करते. ज्यामुळे लाखो लोकांच्या आरोग्याला हानी पोहचू शकते.

  या घटकांमुळे तांदळामध्ये आर्सेनिक नावाच्या विषाचा अतिरेक होतो, ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका होऊ शकतो.

  3 पद्धतींवर प्रयोग
  – अहवालानुसार, विद्यापीठ संशोधकांनी तांदूळ बनवण्याच्या तीन पद्धतींचा अभ्यास केला. त्यापैकी रात्रभर किंवा 3-4 तास पाण्यात भिजविलेले तांदूळ बनविण्याची पद्धत सर्वांत फायदेशीर असल्याचे दिसून आले. संशोधकांनी पहिल्या पद्धतीमध्ये दोन तृतीयांश पाण्यात एक भाग तांदूळ शिजवला.

  – दुसऱ्या पद्धतीमध्ये पाण्याचे पाच भाग आणि तांदळाचा एक भाग शिजवला गेला आणि तांदूळ शिजवल्यानंतर उरलेले पाणी काढून टाकण्यात आले. या दुसऱ्या भागात हानिकारक आर्सेनिकचे प्रमाण जवळजवळ निम्म्यावर आले.

  – त्याच वेळी, तिसऱ्या भागात, तांदूळ रात्रभर भिजत होता. ज्यात हानिकारक घटक 80 टक्क्यांनी कमी झाले.