…म्हणून हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका; छातीत धडधडत किंवा अस्वस्थ वाटत असल्यास अजीबात दुर्लक्ष करु नका

हिवाळ्यात शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. याबाबत तज्ज्ञांनी सांगितले, की हिवाळ्यात विशिष्ट तापमान कायम राहावे यासाठी संरक्षणात्मक व्यवस्थापन म्हणून शरीरात कॅटेकोलामाइन्सची पातळी वाढते. यामुळे ब्लड प्रेशर वेगाने वाढते. यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची जोखीम अनेक पटींनी वाढते. ही जोखीम प्रामुख्याने हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांमध्ये अधिक असते(the Risk of Heart Attack Increases In Winter).

    काही जणांसाठी हिवाळा आनंददायी असतो. बर्फाच्छादित डोंगर पाहून त्यांना नक्कीच भुरळ पडते; पण त्याचे धोकेही काही कमी नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तापमानात घट होताच शरीरात अनेक बदल सुरू होतात. कारण आपलं शरीर एका ठराविक तापमानात संतुलित राहते. जसजसे तापमान कमी होऊ लागते तसतसे शरीर आवश्यक अवयवांचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद दल सक्रिय करते. त्यातून हृदय विकाराचा धोका सुरू होतो(the Risk of Heart Attack Increases In Winter).

    हिवाळ्यात शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. याबाबत तज्ज्ञांनी सांगितले, की हिवाळ्यात विशिष्ट तापमान कायम राहावे यासाठी संरक्षणात्मक व्यवस्थापन म्हणून शरीरात कॅटेकोलामाइन्सची पातळी वाढते. यामुळे ब्लड प्रेशर वेगाने वाढते. यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची जोखीम अनेक पटींनी वाढते. ही जोखीम प्रामुख्याने हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांमध्ये अधिक असते(the Risk of Heart Attack Increases In Winter).

    तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात तापमानात घट झाल्याने शरीर संतुलन बिघडतं. यामुळे शरीरावरचा अनावश्यक ताण वाढतो. जेव्हा शरीरावरचा अनावश्यक ताण वाढतो आणि भीती निर्माण होते तेव्हा कॅटेकोलामाइन्स शरीराला अशा परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करतात. अॅड्रिनल ग्रंथी तणावाच्या स्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशा प्रमाणात कॅटेकोलामाइन्स तयार करतात.

    कॅटेकोलामाइन्सचे प्रामुख्यानं तीन प्रकार असतात. यात इपीनेफ्राइन किंवा अॅड्रिनलिन, नोरेपीनेफ्राइन आणि डोपामाइन यांचा समावेश होतो. जेव्हा शरीरात कॅटेकोलामाइन्सचं प्रमाण वाढतं तेव्हा हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि श्वासाची गती वाढते. त्यामुळे हिवाळ्यात हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकची जोखीम वाढते. हिवाळ्यात अनेकांचा आहार अचानक वाढतो. दिवस लहान असल्याने लोक फिरणे टाळतात. व्यायामाचे प्रमाण कमी होते. एकूणच शारीरिक हालचाली कमी होतात. यामुळे कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर वाढू लागते. काही जणांचे वजनदेखील वाढू लागते.