peanuts
peanuts

शेंगदाण्यांमुळे केवळ पदार्थाची चव वाढत नाही तर त्यातील पोषक घटक आरोग्याला फायदेशीर ठरत आहेत. आरोग्याच्या अनेक समस्या दार होण्यासही मदत होत आहेत.

  पुणे: भारतीय स्वयंपाक घरात, अन्नपदार्थात शेंगदाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेंगदाण्याचा समावेश केल्याशिवाय अनेक भाज्या तयार केल्या जात नाही. शेंगदाण्यांमुळे केवळ पदार्थाची चव वाढत नाही तर त्यातील पोषक घटक आरोग्याला फायदेशीर ठरत आहेत. आरोग्याच्या अनेक समस्या दार होण्यासही मदत होत आहेत. जाणून घेऊन शेंगदाणे खाण्याचं फायदे…

  • सकाळी -सकाळी मूठभर शेंगदाणे खाणे आरोग्यसाठी अत्यंत चांगले असते.
  • शेंगदाणे खाल्यामुळे दातदुखी , पोटाच्या इतर समस्या दार होण्यास मदत होते. महिलांनी मासिक पाळी दरम्यान आहारात शेंगदाण्याचा समावेश केल्यास त्यांना मासिक पाळीत होणार त्रास कमी होतो.
  • शेंगदाण्यात पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, कॅल्शियम, लोह, सेलेनियम इत्यादी अनेक पौष्टिक घटक आढळतात. जर आपण शेंगदाण्याबरोबर गुळाचे सेवन केले तर कंबर आणि सांधे दुखीमध्ये आराम मिळतो.
  • शेंगदाण्याच्या सेवनामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील दूर होते. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम आणि जस्त शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
  • शेंगदाण्याचा सेवन रक्तातील साखर नियंत्रित करते. याद्वारे, आपण मधुमेहासारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकतात.
  • शेंगदाण्याचा आहारात समावेश करत असताना ते भिजवून ठेवा आणि मगच खा.