
बदलत्या ऋतूनुसार शरीराला काढा वेगळा द्यावा लागतो, हे अनेकांना माहित नाही. ऋतूनुसार शरीराला काढा दिल्यास अनेक फायदे होतात सल्ला नेहमी डॉक्टर लोकांना देतात.
आयुर्वेदिक उपचाराच्या अनुशंगाने विचार केल्यास, काढा हा प्रकार अतिशय उपयुक्त असा प्रकार आहे. काढा बनवण्यासाठी हळद, आले, ज्येष्ठमध, दालचिनी, काळीमिरी घटक प्रामुख्याने वापरले जातात. काढा हा कोणत्याही पदार्थांपासून तयार केला जातो. काढ्याचा परिणाम होण्यासाठी तो योग्य पद्ध्रतीने बनवणे गरजेचा आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांकडून काढा घेण्याचा सल्ला दिला जातो. बदलत्या ऋतूनुसार शरीराला काढा वेगळा द्यावा लागतो, हे अनेकांना माहित नाही. ऋतूनुसार शरीराला काढा दिल्यास अनेक फायदे होतात सल्ला नेहमी डॉक्टर लोकांना देतात.
काढा पिण्याचे फायदे
– रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
– गरम काढा प्यायल्याने चरबीचे प्रमाण घटते.
– काढ्यामुळे घशाचे विकार कमी होण्यास मदत मिळते
कोणा सेवन करू नये?
– 5 वर्षाच्या आतील मुलांनी
– मूत्राशयाचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी
– अल्सरची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी
– ब्लड पाईल्स असणाऱ्या व्यक्तींनी