दूध आणि वेट लॉसचे असे आहे कनेक्शन; अनेकांना नाही माहिती

    दूध हा कॅल्शियम आणि प्रोटीनचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. यासाठीच याला पौष्टिक आहार म्हणतात. दुधामध्ये कॅल्शियम असते जे हाडांसाठी तसेच दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे प्रोटीनने समृद्धही असते. यामुळे स्नायू तसेच मांसपेशीचे आरोग्य चांगले राखले जाते. मात्र वजन कमी करत असाल तर दूध घेणे चांगले असते की नाही हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. अनेकजण जे वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करत असतात त्यांच्या मते दूध प्यायल्याने वजन वाढते. मात्र खरं म्हणजे मलईने भरपूर असलेले दूध वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते मात्र टोन्ड आणि डबल टोन्ड दूध वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. जाणून घ्या दुधाचा एक ग्लास वजन वाढवते की नाही.

    150 कॅलरीज कॅलरीज
    एक कप दुधात साधारणपणे 150 कॅलरीज असतात. यात नैसर्गिक साखर असते. बाजारात उपलब्ध असलेल्या फ्लेव्हर्ड दुधात एक्स्ट्रा शुगर असते. ज्यामुळे कॅलरीज वाढण्याची शक्यता असते. दूध हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. प्रोटीन चांगल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे आपण सर्व जाणतो. भूकेच्या हार्मोनला रेग्युलराईज करण्याचे काम प्रोटीन करते. प्रोटीनमुळे पोट भरलेले राहते. यामुळे भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. दात तसेच हाजे मजबूत करण्याशिवाय कॅल्शियम वजन घटवण्यात मदत करते. संशोधनानुसार कॅल्शियम आणि व्हिटामिन डी चयापचय क्रिया वाढवून शरीरातील कॅलरी जाळण्यास मदत करता.

    दुधामध्ये व्हिटामिन बी 3 चे प्रमाण वजन मेंटेन तसेच उर्जा वाचवण्यात फायदेशीर ठरतात. प्रोटीन पचण्यासाठी अधिक वेळ घेतो. त्यामुळे भरपेट खाल्ल्याची भावना निर्माण होते. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार दुधामध्ये संयुग्मित लिनोलेनिक अॅसिड असते जे कॅलरी बर्न करण्यास मदत करते. दुधामध्ये चांगले फॅट असते जे लुब्रिकेशनसाठी आवश्यक असते. तसेच मांसपेशींचे आरोग्य चांगले राखते. यामुळे शरीर मजबूत राहते. दुधामुळे वजन तेव्हाच वाढते जेव्हा आहारात अतिरिक्त कॅलरी खाल्ल्या जातात. जर दुधामुळे वजन वाढत असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आहारात मोठ्या प्रमाणात कॅलरीजचे सेवन करत आहात. केवळ दुधाच्या सेवनाने वजन वाढत नाही.