woman drinking milk

बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बऱ्याच लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. त्याच वेळी, यामध्ये देखील दुमत असते की, कोणत्या वेळी दूध पिणे योग्य आहे? याबद्दल बोलताना बरेच लोक म्हणतात की, सकाळी दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, तर बरेच लोक रात्री दूध सेवन करणे अधिक योग्य मानतात.

    आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की, दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तीपासून ते निरोगी व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, तुम्ही हे पाहिलेच असेल की, बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बऱ्याच लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. त्याच वेळी, यामध्ये देखील दुमत असते की, कोणत्या वेळी दूध पिणे योग्य आहे? याबद्दल बोलताना बरेच लोक म्हणतात की, सकाळी दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, तर बरेच लोक रात्री दूध सेवन करणे अधिक योग्य मानतात.

    अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. दूध पिण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे? आपण कोणत्या वेळी दूध प्यावे? आणि आपल्या शरीरासाठी दूध कसे फायदेशीर आहे? हे देखील जाणून घेऊया.

    दुधाचे फायदे काय?

    दूध हे जरी एक पेय असले, तरी दुधाला संपूर्ण अन्न मानले जाते. दूध हा भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो दुधाच्या रूपातच सेवन केला जातो आणि त्यातून बरेच प्रकारची उत्पादनेही तयार केली जातात. केवळ कॅल्शियमच नाही तर दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे ए, बी 1, बी 2, बी 12 आणि डी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक घटक असतात. या कारणास्तव, ते एक संपूर्ण अन्न मानले जाते. पाचन आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे.

    हे सुद्धा वाचा