तुमची मुलं किती वाजता झोपून उठतात? सकाळी उशीरापर्यंत झोपणाऱ्या मुलांना डायबिटीसचा धोका

लवकर निजे, लवकर उठे त्याला उत्तम आरोग्य लाभे असे नेहमी म्हटले जाते. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्यास आरोग्याबरोबरच बुद्धीही चांगली राहते असे म्हणतात. आपल्याकडे पिढ्यान्-पिढ्या सांगत आलेल्या गोष्टीवर आता विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये याचबद्दल एक महत्त्वाचा निष्कर्ष काढण्यात आला आहे(What time do your children wake up? Children who sleep late in the morning are at risk for diabetes).

  जे टीनएजर्स म्हणजे पौगंडावस्थेतील मुले रोज सकाळी उशिरापर्यंत झोपतात, त्यांना भविष्यात मधुमेहासह आरोग्याच्या अन्य समस्याही निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. अमेरिकेच्या ब्रिंघॅम यंग युनिव्हर्सिटीच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला. या स्टडीच्या दरम्यान टीनएजर्सच्या खाण्याच्या पद्धतीवर संशोधकांनी अभ्यास केला. त्यासाठी एक आठवडा रात्रीची झोप साडेसहा तास आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात रात्रीची झोप साडेनऊ तास घ्यायला सांगून त्यांचे निरीक्षण केले.

  दोन्ही वेळेस त्या स्वयंसेवकांना सारख्याच कॅलरीजचे सेवन देण्यात आले. फळे आणि भाज्या कमी देण्यात आल्या आणि ज्यामुळे रक्तातील शुगर वाढेल असे अन्नपदार्थ जास्त खाण्यास सांगण्यात आले. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जे थकलेले टीनएजर्स होते त्यांनी सरासरी 12 ग्रॅम साखर खाल्ली. म्हणजेच वर्षभरात त्यांच्या शरीरात अडीच ते तीन किलो साखर गेली. म्हणजेच रोजचे तीन चमचे साखर. 14 ते 17 वर्ष वयोगटातील टीनएजर्सवर हे संशोधन करण्यात आले.

  आपण किती खात आहोत यापेक्षा आपण काय खात आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा शुगर लेव्हल वाढवणारे पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ खातो किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खातो तेव्हा ते उर्जा म्हणजेच एनर्जीच्या संतुलनावर नकारात्मक परिणाम करतात. त्याचबरोबर फॅटही वाढवतात. त्यामुळे वजन वेगाने वाढते.

  हे सुद्धा वाचा
  • 2022