alzhimer`s day

दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी वर्ल्ड अल्झायमर डे(World Alzheimer`s Day 2021) साजरा केला जातो. अल्झायमर, डिमेन्शिया याविषयी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अल्झायमर दिनाच्या पार्श्वभूमीवर अल्झायमरमध्ये होणारा त्रास, लक्षणे आणि प्रतिबंध(Symptoms And Causes Of Alzheimer) याविषयी जाणून घेऊयात.

  अल्झायमरच्या आजारामध्ये(Alzheimer Disease) विस्मरण, स्थळ काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्ये बोलता न येणे, परत परत तेच शब्द येणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात.शब्द आठवेनासे होतात. वाक्यरचना तुटक होते आणि शेवटी व्यक्ती मूक होते.हा आजार वाढल्यास दैनंदिन व्यवहार जसे खाणे, पिणे, स्वच्छता, कपडे घालणे वगैरे गोष्टीही अवघड होत जातात. दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी वर्ल्ड अल्झायमर डे(World Alzheimer`s Day 2021) साजरा केला जातो. अल्झायमर, डिमेन्शिया याविषयी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अल्झायमर दिनाच्या पार्श्वभूमीवर अल्झायमरमध्ये होणारा त्रास, लक्षणे आणि प्रतिबंध(Symptoms And Causes Of Alzheimer) याविषयी जाणून घेऊयात.

  अल्झायमरमध्ये होणारा त्रास – या आजारात स्मरणशक्ती कमी होते.तसेच भाषाकौशल्य कमी होते. कोण काय बोलत आहे किंवा करत आहे आपलं काय सुरु आहे याकडे लक्ष राहत नाही. समज कमी होत जाते.अल्झायमरमध्ये रचनात्मक बुद्धीकौशल्ये कमी होतात.भान-स्थळ, काळ, ओळख कमी होते.याशिवाय समस्या सोडवणुकीची क्षमता कमी होते. कार्य-कुशलता कमी होते.

  अल्झायमरचे कारण(Reasons For Alzheimer`s Disease)  – या विकाराचे मुख्य कारण म्हणजे मेंदू आक्रसत जातो व अकार्यक्षम होतो. मेंदूतील सुक्ष्म तंतू एकमेकांत गुंतून जाळी तयार होतात. मेंदूत एका सदोष प्रथिनाचे प्रमाण वाढत जाते. रक्तवाहिन्यांमध्ये देखील थर जमायला लागतात. यामुळे रक्तप्रवाहात अडसर होतो.
  यामुळे रक्तप्रवाहात अडसर होतो.

   प्रतिबंधासाठी आपण काय करु शकतो ?

  • आहारात फळे, भाजीपाला, मासे यांचे योग्य प्रमाण असल्यास काही प्रमाणात आजाराला प्रतिबंध होतो.
  • मधुमेह, अतिरक्तदाब, रक्तात कोलेस्टेरॉलचे जास्त प्रमाण, धूम्रपान टाळावे. यामुळेही हा आजार बळावू शकतो.
  • मेंदूला चेतना देणारे खेळ, संगीत, सामाजिक कार्यक्रमात सहभाग, द्विभाषिक व्यवहार आदीमुळे आजाराला प्रतिबंध होतो.
  • रंगात वापरली जाणारी सॉल्वंट रसायनेही या आजाराला निमंत्रण देतात.

  या आजारावर निश्चित वैद्यकीय औषधे अद्याप नाहीत. काही औषधांचा वापर केला जातो, पण उपयोग मर्यादित आहे. याशिवाय अधिक संशोधन सुरू आहे. घरातील इतर व्यक्तींवर या आजारी माणसाची विशेष जबाबदारी येऊन पडते, त्यांनी संवेदनेने या रुग्णांना समजून घ्यायला हवे.

  सुरक्षितता : आजुबाजूची खोली, वस्तू, व्यवहार सुरक्षित होतील अशी काळजी घ्यायला हवी. उदा. चालताना पायात अडथळा येणाऱ्या वस्तू-रचना काढून टाकणे.

  आहार : बऱ्याच रुग्णांना अन्न भरवावे लागते. काही रुग्ण गिळू शकत नाहीत. त्यांना नळीद्वारे अन्न द्यावे लागते. या गोष्टी शिकाव्या लागतात किंवा प्रशिक्षित व्यक्ती मदतनीस म्हणून लागतात.

  स्वच्छता : डोळे, तोंड व दात, नाक, त्वचा, जखमा इत्यादींची स्वच्छता सांभाळायला लागते. या गोष्टी रुग्णाला करून द्याव्या लागतात. अंथरुणात किंवा नकळत लघवी होणे ही एक मोठीच समस्या असते. यासाठी थोडे नियोजन करावे लागते. पाणी देण्याचे प्रमाण व वेळा, लघवीला नेऊन आणणे किंवा भांडे देणे, नळी घालून ठेवणे हे काही उपाय शिकावे लागतात.