pain awareness month

आजमितीला वयाच्या तिशीतल्या तरुण पिढीला सुद्धा शारीरीक दुखणी सुरू झाली आहेत. आपल्याकडे अंगदुखी(Body pain) व पेनकिलर ही नवरा बायकोची जोडी झाली आहे. अनेक नागरिक वर्षानुवर्षे अंगदुखीसाठी पेन किलरचा वापर करीत असतात. कोरोना महामारीनंतर तर पेन किलर गोळ्यांचा(Use Of Pain Killer Tablets After Corona) वापर वाढला असून ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.

    काल माझे डोके ठणकत होते तर मी मेडिकल दुकानातून गोळी आणली व माझी डोकेदुखी थांबली हा संवाद न केलेला अथवा ऐकलेला माणूस सापडणे म्हणजे दुर्मिळ आहे म्हणजेच आपल्या शरीराला काही त्रास झाला तर पेन किलर गोळी घेण्याचे आपल्यावर संस्कारच झाले आहेत. मात्र वेदनाशामक गोळ्यांचे अतिसेवन हे आरोग्यासाठी त्रासदायक आहे.अमेरिकन क्रोनिक पेन असोसिएशन(American Chronic Pain Association) द्वारा संपूर्ण जगभर सप्टेंबर(World Pain Awareness Month 2021) हा महिना हा वेदना जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो.त्यानिमित्ताने वेदनाशामक गोळ्यांचा(Pain killer Tablets) जास्त वापर केल्याने काय दुष्परिणाम होतात हे जाणून घेऊयात.

    फिजिशियनव व छातीरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ(Dr Praveen Bhujbal) सांगतात की, अंग दुखणं म्हणजेच आपल्या शरीराला सतत त्रास होत राहणे होय. आता या अंगदुखीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. यामध्ये छातीत दुखणे, गुडघे व सांधे दुखणे, तसेच जे नागरिक उदरनिर्वाहासाठी अंगमेहनतीची कामे करतात ते अंगदुखीनी बेजार असतात. आजमितीला वयाच्या तिशीतल्या तरुण पिढीला सुद्धा शारीरीक दुखणी सुरू झाली आहेत. आपल्याकडे अंगदुखी व पेनकिलर ही नवरा बायकोची जोडी झाली आहे. अनेक नागरिक वर्षानुवर्षे अंगदुखीसाठी पेन किलरचा वापर करीत असतात. कोरोना महामारीनंतर तर पेन किलर गोळ्यांचा(Use Of Pain Killer After Corona) वापर वाढला असून ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.

    डॉ. भुजबळ सांगतात की, अनेक आजारांमध्ये अंग मोडून येऊ शकते. प्रामुख्याने संसर्गजन्य ताप, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, अशा आजारांमध्ये तापासोबत अंग दुखते. काहीवेळा शरीरातील डी जीवनसत्व कमी असल्याने सांधेदुखी होते. दात दुखणे, हातापायात वेदना होणे, डोकेदुखी अशा सर्वसाधारण आजारांमध्ये अनेकजण मेडिकल दुकानात जाऊन पेन किलर घेतात त्यामुळे त्यांना तात्पुरता आराम मिळतो परंतु त्या आजाराची कारणे शोधली पाहिजेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जी औषधे वापरली गेली त्या औषधांचा वापर दुसऱ्या लाटेत कमी झाला. मात्र आजही अनेक पहिल्या लाटेचीच प्रिस्क्रिप्शन वापरली जात आहेत. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिस्क्रिप्शन शेयर केली जातात व ते धोकादायक आहे. अनेकवेळा हृदयविकार , ब्रेन स्ट्रोक या आजाराची सौम्य लक्षणे दिसल्यावर अनेकजण पेनकिलर म्हणजे वेदनाशामक गोळ्यांच्या मारा करतात. त्यामुळे पुढील काही दिवस ती लक्षणे दिसत नाहीत व रुग्णाला खात्री वाटते की आपला आजार बरा झाला आहे. मात्र तोच आजार थोड्याच दिवसांनी परत उफाळून येतो व त्यावेळी त्याचे निदान करणे कठीण जाते. पेनकिलरच्या अतीसेवनामुळे किडनी व हृदयाला सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो.

    सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्व-औषधपद्धती म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाद्वारे स्वतः वर औषधोपचार करणे किंवा लक्षणे कमी करण्यासाठी औषधे निवडणे आणि वापरणे होय. आपल्या देशात क्वचितच असे कोणतेही घर नाही जिथे त्यांचे स्वतःचे छोटे मेडिकल स्टोअर नाही, ज्यामध्ये डोकेदुखी, सर्दी-खोकला, पाठदुखी आणि इतर अनेक आजारांसाठी औषधे उपलब्ध असतात व या औषधांमध्ये ८० टक्के ही पेनकिलर औषधे असतात . करोना महामारीशी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र लढत असून पेनकिलर घेऊन आजार अंगावर काढणे आजमितीला आपल्याला परवडणारे नाही, अशी माहिती डॉ. प्रवीण भुजबळ यांनी दिली.