‘असा’ झाला कोका कोलाचा जन्म; जाणून घ्या रंजक इतिहास

भारतात कोका कोलाचा प्रवेश 1950 मध्ये झाला पण 1977 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी कंपनीने 60 टक्के भागीदारी भारतीय उद्योगाबरोबर केली पाहिजे अशी अट घातल्याने कंपनीने भारतातून त्यांचा गाशा गुंडाळला.

    कोकाकोला 135 वर्षांपूर्वी कसा अस्तित्वात (history of coca cola) आला त्याचा इतिहास मनोरंजक आहे. त्यावेळी न्युयॉर्क हार्बरवर स्टॅच्यु ऑफ लिबर्टी तयार होत होता आणि न्युयॉर्क पासून 1200 किमी दूर अटलांटा मध्ये एका घराच्या बेसमेंट मध्ये जॉन पेम्बरटन हा फार्मासिस्ट ड्रिंकचा नवीन फ्लेव्हर तयार करत होता. 8 मे 1886 च्या दुपारी त्याला एक चांगला फ्लेव्हर तयार करता आला आणि त्याने लगेच शेजारी असलेल्या जेकब फार्मसी मध्ये जाऊन हे नवीन फ्लेव्हर चे पेय सोड्यासह मिक्स करून ग्राहकांना टेस्ट करायला दिले. ग्राहकांना ते आवडले.

    तेव्हा पेम्बरटनचे हिशोब लिहिणाऱ्या रॉबीनसन याने या पेयाला कोका कोला नाव दिले. कारण यात कोकची पाने आणि कोलाच्या बिया वापरल्या गेल्या होत्या. त्यावेळी या पेयाच्या एका ग्लासची किंमत होती 5 सेंट.

    मात्र या पेयाची पहिली जाहिरात तयार व्हायला 29 मे 1886चा दिवस उगवावा लागला. अटलांटा मध्ये कोका कोला पाहतापाहता लोकप्रिय झाला. पहिल्या वर्षी मात्र फक्त 9 ग्लास विक्री झाल्याने 26 डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले पण 1887 पासून मात्र विक्री वाढली. आपल्या पेयाच्या विक्रीतून मिळालेला नफा पाहण्याअगोदर पेम्बरटन आजारी पडला आणि 16 ऑगस्ट 1888 ला त्याचे निधन झाले.

    29 जानेवारी 1892 पासून कोका कोला उत्पादन कंपनी सुरु झाली तिचे नाव होते ‘द. कोका कोला कंपनी’. 5 सप्टेंबर 1919 मध्ये ओर्नेस्ट बुडरफ याने ही कंपनी अडीच कोटीना खरेदी केली आणि न्युयोर्क बाजारात ती लिस्ट करण्यात आली. मिसिसिपी मध्ये कोका कोला बाटलीत भरून त्याची विक्री सुरु झाली. कोका कोलाची खूप नक्कल झाली. 12 एप्रिल 1961 रोजी कोका कोलाच्या बाटलीला ट्रेडमार्क रुपात मान्यता मिळाली. दुसऱ्या महायुद्धात कोका कोलाने खूप पैसा मिळविला.

    भारतात कोका कोलाचा प्रवेश 1950 मध्ये झाला पण 1977 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी कंपनीने 60 टक्के भागीदारी भारतीय उद्योगाबरोबर केली पाहिजे अशी अट घातल्याने कंपनीने भारतातून त्यांचा गाशा गुंडाळला. 1993 मध्ये कंपनीने पुन्हा भारतात प्रवेश केला आणि थम्स अप, लिम्का, गोल्ड स्पॉट, माझा ब्रांड खरेदी केले. कोकाकोका कसा बनला त्याची कृती आजही एका कपाटात अतिशय कडेकोट बंदोबस्तात आहे असे म्हणतात.