शरीराला थंडावा देणाऱ्या काकडीपासून घरी बनवून ‘हा’ पदार्थ

उन्हाळ्यामध्ये विशेषता काकडीपासून बनवलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. काकडी खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. काकडीमध्ये भरपूर पाणी असते.

  कडाक्याच्या उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी आपण आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो. यामध्ये मुख्यता आपण दूध, दही, ताक किंवा इतर काही थंड पदार्थांचे सेवन करतो. तसेच थंड पदार्थांसोबत हिरव्या पालेभाज्या, फळे, गाजर, काकडी, कैरी, बीट यांचे सेवन करणे तितकेच गरजचे आहे. उन्हाळ्यामध्ये विशेषता काकडीपासून बनवलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. काकडी खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. काकडीमध्ये भरपूर पाणी असते. तसेच यामध्ये अनेक पोषक घटक देखील आढळून येतात. नुसतीच काकडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर काकडीपासून रायता कसा बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.

  साहित्य:

  १ काकडी
  १ वाटी दही
  साखर
  शेंगदाण्याचा कूट
  जिरं पावडर
  काळे मीठ
  हिरवी मिरची

  कृती:

  सर्वप्रथम काकडीचा रायता बनवण्यासाठी काकडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तिची साल काढून बारीक कापून घ्या. त्यानंतर एका वाटीमध्ये दही घेऊन ते नीट फेटून घ्या. फेटून झालेल्या दह्यात चिरलेली काकडी, चवीनुसार मीठ, साखर , बारीक चिरलेली मिरची , शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार साखर टाकून हे सर्व मिक्स करून घ्या. तयार आहे काकडीचा रायता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला फोडणी देखील देऊ शकता. यामुळे चव अजून वाढेल. काकडीमुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.