घरगुती उपाय केल्याने ३ दिवसात बरा होईल मूळव्याध, जुनाट बद्धकोष्ठता होईल बरी

मूळव्याधाचा त्रास कोणालाही होऊ शकतो. पण वेदनादायी मूळव्याध झाल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काहींना मूळव्याधामुळे धोका देखील निर्माण होतो.

  बदलत्या जीवनशैलीमुळे मूळव्याध (piles) ही समस्या कोणालाही जाणवू शकते. मूळव्याध झाल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हा आजार वेदनादायी असल्याने या आजाराचे निदान झाल्यास लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. अनेकदा काहींना मूळव्याधासाठी शस्त्रक्रिया देखील करावी लागते. ज्या व्यक्तींना मूळव्याध होतो अशांना गुदद्वाराच्या आत किंवा बाहेर सुजलेल्या गाठी तयार होतात. सामान्यता दोन प्रकारचे मूळव्याध आढळून येतो. अंतर्गत मूळव्याध, ज्यांचे गुठळ्या गुदाशयाच्या आतमध्ये तयार होऊन याला कमी वेदना होतात. या मूळव्याधामध्ये आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान रक्तस्त्राव हे एक सामान्य लक्षणं आहेत. तर दुसरा बाह्य मूळव्याध आहे, जो गुदाशय बाहेरील त्वचेखाली तयार होतो आणि हा मूळव्याध अतिशय वेदनादायी असतो.

  मूळव्याधाचा त्रास कोणालाही होऊ शकतो. पण वेदनादायी मूळव्याध झाल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काहींना मूळव्याधामुळे धोका देखील निर्माण होतो. बद्धकोष्ठता, गर्भधारणा, लठ्ठपणा, बराच वेळ बसणे, अन्नात फायबरची कमतरता, कमी पाणी पिणे यामुळे मूळव्याध वाढण्याची शक्यता असते. मूळव्याधाचा त्रास वाढल्यानंतर काहीवेळा डॉक्टरचे उपाय करूनसुद्धा पुन्हा एकदा मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध झाल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र मुळव्याधावर घरगुती उपाय केल्यानंतर आराम मिळू शकतो.

  अंतर्गत मूळव्याधची लक्षणे:

  • आतड्याच्या हालचाली दरम्यान किंवा नंतर स्टूलमध्ये रक्त येणे.
  •  गुदद्वाराभोवती खाज सुटणे
  • शौचास गेल्यावर मल उरल्याची भावना

  बाह्य मूळव्याधची लक्षणे:

  • गुदद्वाराजवळ एक किंवा अधिक गुठळ्या असणे.
  •  गुदद्वाराभोवती वेदना किंवा सूज येणे.
  •  आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान वाढलेली वेदना.
  • कधीकधी गुठळ्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे.

  मूळव्याधावर घरगुती उपाय:

  • जिरं भाजून त्याची पावडर करून पाण्यात टाकून प्यावी. रात्री झोपण्यापूर्वी जिरं पावडर गरम पाण्यात टाकून पिल्याने ३ ते ४ दिवसांत मूळव्याधावर आराम मिळतो. जिरं हे फायबर युक्त असून पोटातील वायू कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मळ सैल होतो व शौचास साफ होते.
  • मूळव्याध असलेल्या रुग्णांनी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या 50मिली पाण्यात टाकून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मूळव्याधावर आराम मिळतो. रिकाम्या पोटी घरगुती औषध खाल्ल्याने त्याचा प्रभाव जास्त पडतो.
  • मूळव्याधीचा त्रास जास्त जाणवत असल्यास किंवा रक्त पडत असल्यास कांद्याचा रस प्यावा. 30 ग्राम कांद्याचा रस व 60 ग्राम साखर एकत्र करून हे मिश्रण दिवसांतून दोनदा पिल्याने ५ ते ६ दिवसांमध्ये मूळव्याधीवर आराम मिळतो.
  • डाळिंबाच्या सालींचा वापर औषध म्हणून केला जातो. मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी डाळिंबाच्या सालीदेखील तितक्याच उपयुक्त आहेत. अर्धाकप डाळिंबाच्या साली उन्हात सुकण्यासाठी ठेवून द्या. सुकलेल्या साली अर्धा कप पाण्यात भिजत ठेवा. .त्यात 1 चमचा जिरं , 3/4 कप ताक व मीठ घालून मिश्रण एकत्र करा. नंतर हे मिश्रण आठवड्यातून तीन वेळेस घ्या,यामुळे मूळव्याधीचा त्रास कमी होतो.
  • पांढरे तीळ कुटून त्याची पेस्ट मोडांवर लावल्यास , आराम मिळतो. चमचाभर तिळ बटरमध्ये एकत्र करून खाल्ल्याने देखील मूळव्याधीवर आराम मिळतो.
  • मूळव्याधीचा त्रास वाढल्यानंतर किंवा सूज आल्यास बर्फ फार उपयोगी आहे. मूळव्याधीच्या त्रासात गुदद्वारापाशी वेदना होत असल्यास पाठीवर झोपून १० मिनिट बर्फाचा शेक घ्या.