राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२२; ‘या’ राशींना खर्चावर ठेवावे लागणार नियंत्रण! नाहीतर होऊ शकेल मोठे नुकसान

  मेष (Aries)
  आज दिवसभर मन प्रसन्न राहील. बोलण्यात संयम ठेवा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च वाडू शकतो. उच्च शिक्षणाच्या निमित्ताने तुम्हाला दूरच्या प्रवासाला जावे लागेल. कामच भार वाढेल. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी मिळतील.

  वृषभ (Taurus)
  आजचा दिवस काहीसा संघर्षाचा असणार आहे. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडू शकते. कामात मनःशांती लाभेल. परंतु, कोणतीही गोष्ट बोलताना विचार करा. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाचा तणाव असू शकतो. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. घरातील वडिलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

  मिथुन (Gemini)
  आजचा दिवस तुमच्यासाठी धाडसाचा असेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मात्र, मजबुरीने काही खर्च करावे लागतील. आर्थिक परिस्थितीचा विचार करू, भविष्यासाठी काही पैसेही वाचण्याची गरज आहे. आजकोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबात सुख-शांती राखण्यासाठी आज तुम्हाला काही लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल.

  कर्क (Cancer)
  आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. महिलांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. निरुपयोगी विचारांमध्ये अडकून राहू शकता. सध्या कोणताही मोठा निर्णय घेणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. घाईत घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम करू शकतो. कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही वेळ थांबा.

  सिंह (Leo)
  आज तुमच्या जवळच्या आणि इतर लोकांच्या भावना ओळखून पुढे जावे लागेल. काही लोकांच्या सल्ल्यानुसार काम केल्यास भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणीही तुम्ही सहकाऱ्यांच्या मदतीद्वारे एखादी समस्या सोडवू शकाल. आर्थिक बाजू मजबूत राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक प्रयत्नांना फळ मिळेल. आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.

  कन्या (Virgo)
  आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहू शकता. कुणाशीही वाद घातल्यास तुमचेच मन दुखावले जाईल. नोकरदार लोकांनी त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करावा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी कर्मचाऱ्यांचा त्रास होऊ शकतो. आज अचानक मोठा खर्च होऊ शकतो. वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

  तूळ (Libra)
  आजचा दिवस तुमच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणणारा आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कोणतेही नवीन काम काम सुरु करताना कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा गांभीर्याने विचार करा आणि मगच एखादा निर्णय घ्या. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे आज सहज पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. एखादा वाद निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

  वृश्चिक (Scorpio)
  आजचा दिवस तुमच्यासाठी काही नवीन समस्या घेऊन येईल. मनातील तणावामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घेणे आज टाळावे लागेल. अन्यथा हा निर्णय चुकीचा सिद्ध होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांमधून आराम मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

  धनु (Sagittarius)
  आज कोणतेही अविचारी पाऊल तुम्हाला अडचणीत आणू शकते. कोणतेही काम करताना उत्साहाचा अभाव राहील. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही चिंतेत असाल. नोकरी-व्यवसायात अडचणी आणि अडथळे येतील. अधिकाऱ्यांशी वाद होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. संयमाने दिवस घालवा.

  मकर (Capricorn)
  आजचा दिवस चांगला असणार आहे. तब्येतीची काळजी घ्या. शिक्षणात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळेल. कामाचा व्याप वाढेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या देखील वाढू शकतात. पालकांकडून मदतीचा हात मिळेल. अनियोजित खर्च वाढतील. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात आरोग्याबाबत सावध राहा. आर्थिक बाबतीत कोणताही धोका पत्करू नका.

  कुंभ (Aquarius)
  आजचा दिवस सामान्य असणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा ताण राहील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. तरुणांसाठी आजचा दिवस आरामदायी असणार आहे. आज तुम्ही मित्रांसोबत धार्मिक स्थळी जाऊ शकता. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कोणताही खर्च करताना भविष्याचा विचार करा. अन्यथा आर्थिकबाबींचा सामना करावा लागू शकतो.

  मीन (Pisces)
  आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा चांगला नाही. एखाद्या गोष्टीवरून जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. अशावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. नात्यातील वादविवाद वाढले, तर तुमचे नातेही संपुष्टात येऊ शकते. मनात एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळ होईल. विचारांच्या गोंधळामुळे तणावात असाल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवा. यामुळे तुमचे चित्त शांत राहील.