आजचे राशीभविष्य : २५ जानेवारी २०२३, ‘या’ राशींच्या लोकांमध्ये अधिक रोमान्स दिसून येईल; अन्य राशींसाठी कसा असेल आजचा दिवस

    मेष (Aries):

    भूतकाळात केलेल्या चुकांमुळे आज तुम्हाला चिंता करावी लागू शकते. मात्र,निराश होण्याऐवजी येणाऱ्या काळात या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली तर बरे होईल. या राशीच्या काही लोकांना मातेच्या बाजूच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवास होईल. कामाच्या ठिकाणी चांगली स्थिती राहील. चांगल्या लोकांशी संपर्क कराल.

    वृषभ (Taurus):

    आज काही लोकांच्या घरात एखादे शुभ कार्य होऊ शकते. प्रेमात पडलेल्या या राशीच्या लोकांच्या आयुष्यात या दिवशी सकारात्मक बदल पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही दिवस चांगला आहे. आज आपल्याला चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

    मिथुन (Gemini):

    लोकांमध्ये अधिक रोमान्स दिसून येईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मित्र किंवा नातेवाईकाच्या मदतीने अचानक चांगला व्यवहार मिळू शकतो. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती कराल. हाती घेतलेल्या कामात चांगलं यश मिळेल.

    कर्क (Cancer):

    आज बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा संध्याकाळी घरचे जेवण करणे चांगले, अन्यथा पोटाशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आज चंद्र तुमच्या आठव्या भावात असेल, त्यामुळे मनाची चंचलता कमी करण्यासाठी ध्यान करा. आज तुम्ही तुमच्या कामात चांगली प्रगती कराल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल.

    सिंह (Leo):

    आज तुमचा कार्यक्षेत्रात प्रभाव चांगला राहील. आजच्या दिवशी या राशीचे लोक कार्य क्षेत्रात रखडलेली कामेही पूर्ण करू शकतात. जे अजूनही बेरोजगार आहेत त्यांना आज रोजगार मिळू शकतो. तुमचा दिवस खूप तणावपूर्ण असेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. तुमचे चुकीचे काम चव्हाट्यावर येईल. त्यामुळे जपून पाऊले टाका.

    कन्या (Virgo) :

    आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडून काही चांगला सल्ला देखील मिळेल आणि आज तुम्ही जीवनातील अनेक समस्यांवर उपाय शोधू शकाल. या राशीच्या काही लोकांना कामाच्या संदर्भात या दिवशी प्रवास करावा लागू शकतो. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. प्रगतीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

    तूळ (Libra) :

    आज या राशीचे लोक त्यांच्या मित्रांसह या दिवशी पार्टीला जाण्याचा विचार करू शकतात. परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस असून, परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती आज पूर्ण होऊ शकते. आपल्याला सामंजस्य दाखवावं लागेल. म्युच्युअल फंड, शिक्षण, ऑटोमोबाइल, शेअर मार्केट, Media किंवा रिअल इस्टेट क्षेत्रात काम करीत असल्यास त्यांच्यासाठी आजचा दिवस लाभदायी आहे.

    वृश्चिक (Scorpio) :

    आज तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून धन मिळू शकते. ज्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे, आज तुम्ही या बाबतीत एक पाऊल पुढे टाकू शकता. मानसिक थकवा जाणवेल. घरगुती बाबींची चिंता राहील. प्रवासाचा योग आहे. बायकोला अंधारात ठेवून ऑफिसातील महिलेसोबत अनैतिक संबधात अडकलेल्या लोकांचे गुपित आज सार्वजनिक होण्याची शक्यता आहे.

    धनु (Sagittarius):

    आज तुमची सर्जनशील क्षमता विकसित होईल. आज स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आरोग्याबाबत जागरूक असायला हवे. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने दिवस अनुकूल राहील. भागीदारीच्या कामातही दिवस अनुकूल आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या मेहनतीचे आणि अथक प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

    मकर (Capricorn) :

    आज तुम्हाला कुठूनही चांगली बातमी मिळू शकते. निधी वाढण्याचे योगही आहेत. पती-पत्नीमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राहील. आज कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमचे कामही चांगले राहील. पैसे असतील, पण अचानक खर्चही होतील. जर तुम्ही हुशारी वापरून काम केले तर तुम्हाला त्यात यश मिळेल.

    कुंभ (Aquarius) :

    आज सामाजिक स्तरावर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. तुमच्या बोलण्याने लोकांची मने जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शेअर मार्केट आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी दिवस आनंददायी राहील. दिवसाची सुरुवात चांगली होईल. लोकांकडून आपल्याला आपुलकीची भावना दिसेल.

    मीन (Pisces) :

    आज तुम्हाला प्रसन्न वाटेल. या राशीच्या लोकांना जमीन-इमारतीच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात प्रेम राहील. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. आज चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत सकारात्मक परिणाम पाहता येतील.