आजचे राशीभविष्य : २६ जानेवारी २०२३ या राशींना मिळणार लाभ तर कोणाचा वाढणार खर्च; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

  मेष (Aries) :

  धनलाभ आणि संसारिक सुख मिळू शकेल. आजचा दिवस सन्मान,प्रतिष्ठा व धनलाभ मिळवून देणारा ठरेल.व्यापारात नवीन मागणी व कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. आज आपले शत्रू सुद्धा माघार घेतील.कौटुंबिक जीवनात आपल्या जीवनसाथी कडून सहकार्य मिळेल.संध्याकाळी खरेदीचा योग आहे.

  वृषभ (Taurus) :

  आपल्यासाठी आजचा दिवस विशेष लाभदायक आहे. आपल्याहून वरिष्ठ असलेल्या व्यक्ती सुद्धा आपले म्हणणे ऐकतील. सर्व महत्त्वाची कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. व्यवसाय करत असाल तर अशी शक्यता आहे की गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. रात्रीचा वेळ मित्र आणि आप्तेष्टांसोबत घालवण्याचा योग येईल.

  मिथुन (Gemini) :

  अचानक अपत्य कष्ट व मानसिक त्रासाची स्थिती उद्भवेल.त्यामुळे आजचा दिवस धावपळीत व विशेष चिंतेत जाईल.लक्षात असू द्या, आज जर नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर देवाच्या नामस्मरणाने सुरुवात करा .संध्याकाळी मित्राच्या भेटीने मन प्रसन्न होईल.कार्यसिद्धीस जाईल,व्यस्त राहाल.

  कर्क (Cancer) :

  आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक असेल.गुंतवणूक कार्यात अपेक्षित लाभ मिळेल.काही महत्वाच्या व्यक्ती अचानक आपल्या कार्यात आपली मदत करण्यासाठी पुढे येतील,ज्यांच्याविषयी आपण कधी विचारही केला नसेल.संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.

  सिंह (Leo) :

  धनलाभाचा आणि कोशवृद्धीचा संकेत देत आहेत.चंद्र आज मीन राशीत स्थिर असल्याने आपल्या पराक्रमांमध्ये वाढ होईल. देण्याघेण्याच्या व्यवहारात महत्वाचे संबंध प्रस्थापित होतील. कार्यक्षेत्रातील परिस्थिती आपल्याला अनुकूल राहील.प्रेम संबंधात गोडवा निर्माण होईल.विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होईल.

  कन्या (Virgo) :

  आईसाठी कष्टजनक परिस्थिती उद्भवेल व कौटुंबिक समस्या निर्माण होतील.कुठल्याही नवीन कामात घाई करू नका.आपल्या तत्वांसाठी ठरलेले कार्य तुम्ही थांबवूही शकता. विरोधकांचा प्रभाव कमी होईल.सरकारी क्षेत्रातील कामे होतील.अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.

  तुळ (Libra) :

  लवकर खराब होईल अशा कोणत्याही वस्तूची खरेदी करू नये. तसेच कमी किमतीला भुलून हलक्या दर्जाची वस्तू विकत घेऊ नये. अन्यथा पुढे जाऊन आपल्या खरेदीविषयी पश्चाताप होऊ शकतो. कोणत्याही नवीन ठिकाणी विचारपूर्वक गुंतवणूक करावी.

  वृश्चिक (Scorpio) :

  काही अर्धवट कामे पूर्ण होतील. परदेशी जाण्याचा योग येईल. पण आपल्या राशीत चंद्राचा प्रभाव असल्याने आराम कमी व संघर्ष अधिक असेल. तब्येतीची निगा राखावी लागेल. उत्पन्नात वाढ होईल.

  धनु (Sagittarius) :

  कामातही विघ्ने निर्माण होतील.चौथ्या घरात व्यर्थ खर्च तसेच अपकीर्तीचा धोका दर्शवतो.परदेश संबंधी कार्य व अपत्यांवर अनावश्यक खर्च होऊ शकतो. कोर्टकचेरीच्या कामात अडथळे निर्माण होतील.

  मकर (Capricorn) :

  आजचा दिवस मिश्रफळ देणारा असेल. आपल्या राशीचा स्वामी शनिच्या राशीत स्थित असल्याने तुमच्या प्रभाव-प्रतापात वृद्धी होईल. शनी मंद फलदायी आहे. तरीही अतिपरिश्रमाने निर्वाहयोग्य उत्पन्नाची साधने मिळत राहतील. दिवसाच्या शेवटी हलके स्वास्थ्य तसेच एखाद्या जखमेची भीती राहील.आजच्या रात्री प्रवास करणे टाळा.

  कुंभ (Aquarius) :

  आपल्या राशीवर मकर राशीच्या गुरू ग्रहाची तृतीय दृष्टी असल्याने आज विशेष धनलाभ व उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. उच्च प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संपर्क वाढतील. परदेश संबंधी कार्यात प्रगती होईल. आरोग्याविषयी सतर्क राहा. शितोष्ण विकार निर्माण होऊ शकतात.

  मीन (Pisces) :

  आपल्यासाठी आजचा दिवस अपेक्षेप्रमाणे शुभ राहील.राशीचा स्वामी शनी मकर राशीत असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना विशेष संधी प्राप्त होतील. रात्रीच्या वेळी व्यापारातील भागीदार तसेच भावंडांसोबत तणाव निर्माण होऊ शकतो.