daily today horoscope 13 march 2023 sagittarius rashi will get family support read your daily horoscope in marathi nrvb

    मेष (Aries):

    आज घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळावे. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना आपल्या लहान भावंडांकडून लाभ मिळेल. तुम्ही प्रत्येक ध्येय आत्मविश्वासाने आणि मेहनतीने साध्य कराल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. तुम्ही कुठेतरी दिलेले पैसे परत मिळवू शकता. नवीन नोकरीतून तुम्हाला भरपूर यश मिळेल. प्रेमसंबंध उघड होण्याची शक्यता आहे. तुमच्या इभ्रतीला दगाफटका होऊ शकतो. स्त्रीसंबंधापासून दूर राहावे.

    वृषभ (Taurus):

    तुम्हाला सामाजिक स्तरावर मानसन्मान मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज सर्वांचे ऐकण्याचा प्रयत्न कराल. धैर्याने नवीन आव्हानांचा सामना करा, मार्ग सोपा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामे होतील. महिलांना कोणताही घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर दिवस चांगला जाईल. मुलांसाठी आज आवडत्या मुलीकडे प्रेम व्यक्त करण्याचा उत्तम दिवस आहे. प्रेमाला नक्की होकार मिळेल.

    मिथुन (Gemini):

    आज प्रेमी युगुलांना काही चांगले अनुभव येतील. आपल्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला सगळीकडून खूप स्तुती ऐकायला मिळणार आहे. जर महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण करा. तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करू शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. घरगुती खर्चात घट होऊ शकते.

    कर्क (Cancer):

    आज तुम्हाला कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव मिळेल. काही व्यक्ती आज वाहन खरेदी करण्याचा विचार आपल्या आईवडील किंवा जोडीदारासोबत शेअर करतील. तुमचा दिवस सामान्य सुरू होईल. तुम्ही पैशांचे फेरफार करण्यात मग्न असाल. जर तुम्ही कुटुंबातील सदस्याबरोबर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते चांगले होईल. कामाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही.

    सिंह (Leo):

    तुम्ही आपल्या शत्रूला हरवण्याचा प्रयत्न करू शकता. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही आपल्या कामात स्वतःला गुंतवून घेतल्यास लाभ होईल. महिलांसाठी आजचा दिवस शुभ राहील. प्रत्येकाच्या प्रार्थनेचा परिणाम काही आनंदी असेल. तुम्हाला स्वतःला आज उत्साही वाटेल. रखडलेल्या कामात गती मिळणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतलेले असेल.

    कन्या (Virgo):

    आज आपल्या जोडीदारासोबत तुम्ही मजेत वेळ घालवाल. व्यावसायिक आज आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भविष्यासंबंधीत योजना बनवतील. तुमच्या कुटुंबात परस्पर सामंजस्य वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक प्रकरणावर स्पष्ट भूमिका ठेवा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते.

    तूळ (Libra):

    आरोग्याविषयी बेजबदारपणा आज तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आज सहज पचतील अशा अन्नपदार्थांचे सेवन करावे. व्यायाम केल्यास तुम्हाला फायदा होईल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीच्या मदतीने अवघड कामे सुद्धा सहजपणे पूर्ण होतील. वेळेवर प्रकल्प राबवू शकतील. व्यवसायात नफ्याच्या संधी असतील. आज उसने दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक (Scorpio):

    जीवनात संतुलन निर्माण होईल. काही व्यक्तींना कामाच्या निमित्ताने आज प्रवास करावा लागू शकतो. तुम्ही नवीन ध्येये सेट करा आणि तुमचे प्रयत्न सुरू करा. आपण काही व्यावसायिक बाबी हुशारीने हाताळू शकता. संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. कोणतेही काम करताना तुम्हाला तुमचे मन शांत ठेवावे लागेल. कौटुंबिक जीवनात काही नवीनपणा जाणवेल.

    धनु (Sagittarius):

    करियरमध्ये तुम्हाला इच्छित यशप्राप्ती होईल. आज एखाद्या सहकाऱ्याला मदत केल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुम्ही सर्वांशी नम्रपणे बोलायला हवे. राजकारणातील संपर्क क्षेत्र विस्तृत असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. चांगल्या कामामुळे नोकरीत पदोन्नती आणि उच्च पद मिळण्याची चिन्हे आहेत.

    मकर (Capricorn):

    आज धनलाभ होईल. जर तुम्ही पूर्वी एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर आज त्यातून तुम्हाला लाभ मिळेल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. तुम्हाला स्वतःला योग्य वाटेल. तुमचा समजूतदारपणा आणि विनयशीलता पाहून प्रत्येकजण खूप प्रभावित होईल. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत मनोरंजक ऑफर मिळू शकतात. आपला मुद्दा इतरांसमोर मोकळेपणाने ठेवा.

    कुंभ (Aquarius):

    तुमचा व्यवहार शालीन राहील. आज तुम्ही आपल्या गोड बोलण्याने जोडीदाराला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कराल. तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कुटुंबातील एका तरुण सदस्याच्या यशाचा अभिमान वाटेल. व्यावसायिकांसाठी दिवस लाभदायक असेल. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने तुम्ही खर्च करण्याच्या मनःस्थितीत असाल. नवीन कामात काही अडथळे येऊ शकतात.

    मीन (Pisces):

    आज तुम्हाला सांभाळून खर्च करावा लागेल. आज कुणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा. अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस सुखद राहील. तुम्ही सर्वांशी नम्रपणे बोलायला हवे. राजकारणातील संपर्क क्षेत्र विस्तृत असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची ऑफर मिळेल. कुटुंबियांसोबत ‘वीक एन्ड’ साजरा करण्याचे नियोजन आखाल.