कुंभ दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; मानसिक आनंद वाढून मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होईल

    कुंभ (Aquarius) :

    क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात वर्चस्व वाढेल व सहकारीवर्ग मनोनुकूलरीत्या सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक यश दृष्टिक्षेपात राहून यश मिळेल. पारिवारिक आनंद वाढविणारे समाचारपत्र हाती येईल. कौटुंबिक सदस्य मनोनुकूलरीत्या सहकार्य करतील. मानसिक आनंद वाढून मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होईल. आप्तस्वकीयांपासून सावध राहावे. आपली पैशांच्या बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. पैसे उधार देऊ नये.

    आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, २