कुंभ दैनिक राशीभविष्य २४ डिसेंबर २०२१ ; जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामे होतील

    कुंभ (Aquarius) :

    आज चंद्र तुमच्या वाणी भावात विराजमान आहे. चंद्राची ही स्थिती तुम्हाला सामाजिक स्तरावर मानसन्मान मिळवून देईल. तसेच या राशीतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज सर्वांचे ऐकण्याचा प्रयत्न कराल. धैर्याने नवीन आव्हानांचा सामना करा, मार्ग सोपा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामे होतील. महिलांना कोणताही घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर दिवस चांगला जाईल. मुलांसाठी आज आवडत्या मुलीकडे प्रेम व्यक्त करण्याचा उत्तम दिवस आहे. प्रेमाला नक्की होकार मिळेल.

    शुभ रंग आणि अंक : जांभळा, ४