कुंभ दैनिक राशीभविष्य : २९ डिसेंबर २०२१ ; जे बऱ्याच काळापासून वाहन खरेदी करण्याचा विचार करत होते त्यांचे स्वप्न देखील आज पूर्ण होऊ शकते

    कुंभ (Aquarius) :

    दिवस आपल्यासाठी खूप खास असणार आहे. चतुराईने काम केलं तर आपला फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी आपलं कौतुक होईल. आज तुम्ही तुमच्या मनातील गुपिते आईला सांगू शकाल. तुमचे कोणावर प्रेम असेल तर तुम्ही त्याचे नाव घरातील लोकांसमोर उघड करू शकता. या राशीचे लोक कौटुंबिक जीवनात चांगला वेळ घालवू शकतात. या राशीचे लोक जे बऱ्याच काळापासून वाहन खरेदी करण्याचा विचार करत होते, त्यांचे स्वप्न देखील आज पूर्ण होऊ शकते. आज ८६% नशिबाची साथ आहे. भगवान शंकराला बेलाची पाने अर्पण करा.

    शुभ रंग आणि अंक : केशरी, ७