मेष दैनिक राशीभविष्य १५ डिसेंबर २०२१ ; आर्थिक गोष्टींकरता आजचा दिवस शुभ आहे

    मेष (Aries) :

    विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. उधार देण्यापासून सावध राहा. व्यवसाय आणि धनप्राप्तीसाठी दिवस संमिक्ष स्वरुपाचा असेल. पोटाचे आजार उद्भवतील. आहाराकडे लक्ष द्या अन्यथा विकार होण्याची शक्यता आहे. सहकार्यांना मदत केल्याने नवं काही शिकायला मिळेल. तुमचा उत्साह दांडगा असेल. आर्थिक गोष्टींकरता आजचा दिवस शुभ आहे. महिला किचनच्या कामात अधिक सतर्क राहतील. तसेच काहीजण आज छोटोसा व्हॅकेशन प्लान करतील. कोणताही मोठा निर्णय घेताना विचार करून त्याला अंतिम करा. प्रियकरासोबत थोडा अबोला निर्माण होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. आक्रमकता वाढेल.

    शुभ रंग आणि अंक :निळा, ८