
मेष (Aries):
सामाजिक मेळावे आणि नातेवाईकांच्या भेटीतून तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुम्ही नोकरी बदलण्याच्या शोधात असाल तर तुम्हाला ही संधी मिळू शकते. नवीन काम सुरु करताना स्पर्धा असेल. सर्व व्यावसायिकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील, गेल्या आठवड्यात रखडलेली कामेही या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. तथापि, काही लोकांना कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा वडिलांशी मतभेद होऊ शकतात. आज ८०% नशिबाची साथ आहे. पिवळे कपडे घालून घराबाहेर पडा.
शुभ रंग आणि अंक : निळा, ८