मेष दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल

    मेष (Aries) :

    मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक चढ-उतार स्थिती राहील. आर्थिक क्षेत्रातील बहुतेक अंदाज चुकतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे उचित.

    आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, १