मेष दैनिक राशीभविष्य २४ डिसेंबर २०२१ ; काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत

    मेष (Aries) :

    आज चंद्र तुमच्या द्वादश स्थानी असल्याने तुम्हाला सांभाळून खर्च करावा लागेल. आज कुणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा. अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस सुखद राहील. तुम्ही सर्वांशी नम्रपणे बोलायला हवे. राजकारणातील संपर्क क्षेत्र विस्तृत असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची ऑफर मिळेल. कुटुंबियांसोबत ‘वीक एन्ड’ साजरा करण्याचे नियोजन आखाल.

    शुभ रंग आणि अंक : लाल, ७