कर्क दैनिक राशीभविष्य १४ डिसेंबर २०२१ ; कुटुंबातील सदस्याबरोबर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते चांगले होईल

    कर्क (Cancer):

    मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. कौटुंबिक वाद होतील. नशीबाची साथ मिळणार नाही. कामाच्या क्षेत्रात झगडावे लागेल. तुमच्या दिवसाची सुरुवात सामान्य राहील. तुम्ही पैशांचे फेरफार करण्यात मग्न असाल. जर तुम्ही कुटुंबातील सदस्याबरोबर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते चांगले होईल. कामाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. कुटुंबातील सदस्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न कराल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ४