मकर दैनिक राशीभविष्य २४ डिसेंबर २०२१ ; तुम्हाला सगळीकडून खूप स्तुती ऐकायला मिळणार आहे

    मकर (Capricorn):

    आज चंद्र तुमच्या पाचव्या स्थानी स्थित आहे. या स्थानी असणाऱ्या चंद्राच्या प्रभावामुळे आज प्रेमी युगुलांना काही चांगले अनुभव येतील. आज या राशीतील व्यक्ती आपल्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यात यशस्वी होतील. तुम्हाला सगळीकडून खूप स्तुती ऐकायला मिळणार आहे. जर महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर रविवारी ते पूर्ण करा. तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करू शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. घरगुती खर्चात घट होऊ शकते.

    शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४