मकर दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; चंद्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळतील

    मकर (Capricorn) :

    एखादा मित्र किंवा मैत्रिणीसोबत भागीदारी करून पैसा मिळेल. जोडीदार किंवा कुटुंबीयांविषयी असलेल्या चिंता दूर होण्याची शक्यता. नोकरी आणि व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागतील. एखादी व्यक्ती आकर्षित होण्याची शक्यता. चंद्र या दिवशी तुमच्या दुसऱ्या स्थानी असेल, हे वाणी आणि आर्थिक स्थान म्हणूनही ओळखले जाते. या स्थानी चंद्राची उपस्थिती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. चंद्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळतील. आज हुशारीने गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो. आज ८६% नशिबाची साथ आहे. भगवान शिवाची स्तुती करा.

    आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, १