मकर दैनिक राशीभविष्य : ७ जानेवारी २०२२ ; पाहुणे सुद्धा काही दिवस तुमच्याकडे राहतील व खर्चात वाढ होईल

    मकर (Capricorn) :

    जुने अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तर दिवस काळजीचा व धावपळीचा असेल. बायकोच्या आरोग्याबाबत सावधान रहा. पाहुणे सुद्धा काही दिवस तुमच्याकडे राहतील व खर्चात वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल आणि कुठूनतरी धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल.