
मकर (Capricorn) :
आजचा दिवस यशप्राप्ती देणारा असेल. भाग्यात वृद्धी होईल. ग्रहांच्या शुभ योगामुळे तुमच्या नशिबात वाढ होईल. महान व्यक्तीकडून किमती वस्तू मिळू शकते. शुभ योगाने थांबलेल्या कामांना गती मिळेल. आजचा दिवस मित्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल पण दीर्घकाळ स्मृतीत राहील. समाजात मानसन्मान वाढेल.