rashi bhavishya

Daily Horoscope 22 December 2020

मेष- धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. शत्रूवर विजय मिळवाल. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी आहेत. आत्मविश्वास वाढलेला असेल. मित्रांची मदत मिळेल.

वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर परिणाम होणार आहे. इतरांसाठी तुमचं मत महत्त्वाचं असेल. प्रवासयोग संभवतो. येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे.

मिथुन- आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थार्जनाच वाढ होईल. दिवस उत्साही असेल. नशिबाची साथ मिळणार आहे. विचारशक्ती सकारात्मक ठेवा. सर्वकाही सुरळीत होणार आहे.

कर्क- करिअरच्या दृष्टीनं एककेंद्री असाल. जास्त संवेदनशील व्हाल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. सुखद घटना घडतील.

सिंह- सामाजिक स्तर उंचावेल. तुमच्यासाठी ही वेळ चांगली आहे. नवी जबाबदारी मिळेल. आर्थिक चणचण संपुष्टात येईल.

कन्या- दिवस सर्वसामान्य असेल. देवाणघेवाणीचे मोठे व्यवहार होतील. कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये जाण्याची संधी मिळेल. जास्त मेहनत करा, त्याचं फळही मिळणार आहे.

तुळ- कोणतंही काम अडणआर नाही. एखादं काम सुरु कराल त्यामध्ये संकोच बाळगू नका. सोबत असणाऱ्यांची मदत मिळेल. वेळेवर सर्व कामं पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळणार आहे.

वृश्चिक- पद, वेतन आणि जबाबदारी वाढेल. नशिबाची साथ असल्यामुळं विचाराधीन कामं पूर्ण होतील. वास्तववादी विचारसरणीचा फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल.

धनु- महत्त्वपूर्ण व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबात एकता राखण्यात यशस्वी व्हाल. शुभवार्ता मिळेल. अडचणी दूर होतील.

मकर- व्यापारामध्ये काही चांगल्या घटना घडण्याचा योग आहे. नशिबाची साथ असल्यामुळं संकटांचा फारसा परिणाम तुमच्यावर होणार नाही. मित्रांची मदत मिळेल.

कुंभ- जास्तीची कामं हाती येतील. दैनंदिन जबाबदारीही पार पाडा. विचाराधीन कामं पूर्ण होतील. वडिलांची मदत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मीन- एखादा मोठा आणि महत्त्वाचा बदल घडेल. अडचणी दूर होतील. प्रेमसंबंधांमध्ये यशस्वी व्हाल. जास्तीत जास्त कामं मार्गी लावा