rashi bhavishya

Daily Horoscope 23 December 2020
मेष –
विचारपूर्वक काम करा. कामाप्रती असणारी एकाग्रता खंडित होऊन देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी एखादं नवं काम तुम्हाला दिलं जाऊ शकतं. सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहाल. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ-   दिवस चांगला आहे. आज जे काम हाती घ्याल ते पूर्ण होतील. अधिकारी कौतुक करतील. जुने काम मार्गी लागतील. कामात यश मिळेल. आज एखादी खास गोष्ट कानांवर येईल.

मिथुन-    जबाबदाऱ्या वाढतील. दिवस व्यस्त स्वरूपाचा असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. जुन्या अडचणींवर मात कराल. मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. साथीदाराला पूर्ण वेळ द्या.

कर्क-  दिवस चांगला आहे. अचानक धन लाभ होईल. अनेक नव्या योजनांवर विचार कराल. कामात प्रगती होईल. बेरोजगार लोकांसाठी आज चांगला दिवस आहे. संधी मिळतील.

सिंह – आर्थिक स्थितित बदल होतील. ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कामकाजात जबाबदाऱ्या वाढतील. ऑफिसमध्ये वातावरण चांगले राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबासमोर तुमचे निर्णय अधिक स्पष्टपणे मांडाल. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

कन्या – जे काम हाती घ्याल त्यामध्ये यश मिळेल. दिवस चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. बाहेर फिरण्याचे योग आहेत.

तुळ- व्यस्त असाल. शांततेने काम करा. इतरांचं म्हणणं तितक्याच गांभीर्याने ऐका. इतर व्यक्ती तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. कागदोपत्री व्यवहारावर लक्ष ठेवा. जबाबदारी वाढेल.

वृश्चिक-  आज योग्य निर्णय घ्याल. आज कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर योग्य आहे. कुणा व्यक्तीवर विश्वास ठेवून काम करत असाल तर सावधान.

धनू- महत्वाचे निर्णय तुम्ही स्वतः घेण्याचा प्रयत्न करा. ती एक चांगली गोष्ट आहे. आपली सगळी ऊर्जा आज कामाला लावा. तुम्ही आज जे काही मिळवण्याचा प्रयत्न कराल ते मिळवू शकाल. स्वतःचं चिंतन करा आपण कुठे आहोत आणि काय करू शकतो.

मकर- आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी किंवा व्यापारात जे लक्ष्य निर्धारित केलं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा. एकाग्रतेने काम करण्याचा प्रयत्न करा. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.

कुंभ- नवी संधी मिळेल. तुमच्या योजनांना समर्थन मिळेल. व्यापारात पूर्णपणे यशस्वी व्हाल. नव्या व्यक्तींशी भेट घडेल. नशिबाची साथ असेल. सकारात्मक राहा.

मीन-  जुन्या कामांचा फायद होईल. जुन्या मित्रांची अचानक मदत होईल. धार्मिक यात्रेवर जाण्याचा योग आहे. दिवस शांततेत व्यतीत होईल. आज तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. प्रयत्न करत राहा, साथीदाराचं सहकार्य मिळेल.