राशी भविष्य दि. २५ डिसेंबर २०२०; ‘या’ राशीच्या लोकांना भेटणार त्यांचे जुने प्रेम

मेष –  काहीबाबतीत  तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपल्या व्यवसायातील कामामुळे आपले कार्यक्षेत्र वाढण्यास अनुकूल आहे. नव्याने काम करण्यास उत्साह निर्माण होईल. काहींचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.

वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. हाती पैसा येण्याचे संकेत आहेत. तसेच कौटुंबीक वातावरण छान राहिल. एखाद्या नवा निर्णय घेताना अनेक वेळा विचार करुन घ्यावा, जेणेकरुन भविष्यात लाभ होईल.

मिथुन- आज आपण आपल्या कुटुंबीयांना वेळ द्याल. आजचा दिवस चांगला जाईल. जुना प्रियकर किंवा प्रेयसी भेटण्याचा योग्य संभवतो. आज आपल्याला मानसिक स्वास्थ लाभेल.

कर्क – आजचा दिवस व्यापार वृद्धीस अनुकूल आहे. नोकरीतील आपल्या चांगल्या कामामुळे वरिष्ठ खूष होऊन एखादी सवलत देतील. वैवाहिक सौख्य लाभेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.

सिंह- आजचा दिवस चांगला जाईल. आज नोकरी-व्यवसायात जादा कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. त्यामुळे भविष्यात त्याचा लाभ होवू शकतो. कामावर लक्ष केंद्रीत करा.

कन्या- मित्रपरिवारावर विश्वासाने आपले महत्वाचे काम सोपवू नका. महत्वाची कामे करणे आज टाळा. नोकरीत एखादी संधी मिळण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

तूळ- आजचा दिवस तूळ राशीसाठी चांगला आहे. गोड बोलण्यामुळे सामाजिक कार्यात आपल्याला महत्वाचे स्थान प्राप्त होईल. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा.

वृश्चिक- नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवेल, दगदग होईल. परंतु आज केलेल्या कामाचा आपल्याला भविष्यात निश्चित फायदा होईल. आजचा दिवस भाग्यवृद्धीसाठी अनुकूल आहे. पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील.

धनु- शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. उष्णतेचे विकार जाणवतील. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.

मकर-  अपेक्षित गाठीभेटी होतील. कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. नोकरीत बढती-बदलीचे योग संभवतात. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.

कुंभ – आज आपल्या घरी पाहुणे येतील. त्यामुळे आजचा दिवस चांगला जाईल. संततीसौख्य लाभेल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. त्यामुळे जास्त तोटा सहन करावा लागेल.

मीन- आपला आजचा दिवसा बऱ्यापैकी जाईल. आपल्याला आज काही कामांची पोचपावती मिळेल. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. एकादे काम करताना काळजी घ्या. आपले आरोग्य जपा.