राशी भविष्य दि. ३० मार्च २०२१; या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती राहील मजबूत

  मेष- व्यवसायात आज आपल्याला चांगला फायदा होईल. आरोग्य आणि प्रेम दोन्हीसाठी आजचा दिवस उत्तम आहे.

  वृषभ- आर्थिक स्थिती मजबूत राहिल. आरोग्य चांगलं असेल. व्यवसायात आज आपली कमाई आणि दृष्टीकोन योग्य असेल. आज आनंदाची बातमी मिळेल.

  मिथुन- आरोग्य चांगलं राहिल. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. थोडी सावधानी आजच्या दिवस बाळगण्याची गरज आहे.

  कर्क- आज आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात आजचा दिवस संमिश्र असेल.

  सिंह- आपल्या सगळ्या अडचणी आज दूर होतील. आज आपला दिवस खूप छान जाणार आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

  कन्या- आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. प्रिय व्यक्ती भेटल्यानं दिवस उत्तम जाईल.

  तुळ- आरोग्य चांगलं असेल. व्यवसायात हळूहळू प्रगती होताना दिसेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

  वृश्चिक- कौटुंबिक वादापासून आज दूर राहा. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल.

  धनु- रोजगाराच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आरोग्याची काळजी घ्या.

  मकर- बोलताना विशेष काळजी घ्या. आज पैशांची बचत करण्याकडे लक्ष द्या. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.

  कुंभ- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. प्रेमातही आज आपल्याला लाभ मिळेल. व्यवसायात लाभ होण्याचे संकेत.

  मीन- आज आपण दिवसभर अस्वस्थ असाल. मनात चलबिचल राहिल. प्रिय व्यक्तीपासून आज दूर जाण्याची शक्यता आहे.