मिथुन दैनिक राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२१ ; कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल, तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील

    मिथुन (Gemini) :

    तुमचा संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुम्ही कामात चांगले पैसे कमवाल. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. दिवस चांगला जाईल नशीब तुमच्या सोबत आहे, कुटुंबातून आनंदाची परिस्थिती राहील. देवाचे ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील. मेहनतीनुसार यश मिळेल. व्यवसायाकडे लक्ष देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. आज दुपारपर्यंत, तुम्ही तुमच्या विखुरलेल्या व्यवसायाला योग्य मार्ग दाखवावा, तुम्हाला आणखी वेळ मिळणार नाही. आपल्या हातून शेजारी, कार्यक्षेत्रात सहकारी किंवा नातेवाईक यांची निंदा, नालस्ती होणार नाही याची दक्षता पाळावी;

    शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३