मिथुन दैनिक राशीभविष्य : २९ डिसेंबर २०२१ ; या दिवशी सामाजिक स्तरावर तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते

    मिथुन (Gemini):

    हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. लोकांना करिअर क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. या दिवशी सामाजिक स्तरावर तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. भाऊ-बहिणीच्या मदतीने या राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. या दिवशी तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मांचे योग्य फळही मिळू शकते. मात्र, या दिवशी घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळावे. आज ९०% नशिबाची साथ आहे. प्राणायाम करा.

    शुभ रंग आणि अंक : आकाशी, ३