मिथुन दैनिक राशीभविष्य : ९ डिसेंबर २०२१ ; आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल

    मिथुन (Gemini) :

    करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्यांना इतरांची मदत मिळेल. काही चांगले आणि महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यापारामध्ये अनुभवींचा सल्ला मिळेल. धनलाभ होण्यची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. पैसे मिळवण्याच्या संधी असतील. कोर्टाची प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. नोकरदार लोकांचा एखाद्या सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो, सावधगिरी बाळगा.

    आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४