राशिभविष्य २४ सप्टेंबर, २०२१; सावधान ! ‘या’ ०२ राशीच्या लोकांना आज भविष्यकालीन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल; पण फसव्या आमिषाला बळी पडू नये.

  मेष (Aries) :

  भाग्य तुमच्या सोबत असेल. आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतील. रखडलेली काम प्रगतीपथावर येतील. लेखन, साहित्य, कला, सिनेमा, टीव्ही, जाहिरात क्षेत्रातील व्यक्तींना नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  वृषभ (Tarus) :

  नशिबाची साथ मिळेल. महत्वाकांक्षी योजना तडीस जाऊ शकतात. नव्या क्षेत्रातील सुरुवात करताना भागीदारासह विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्यांची प्रलंबित असलेली कामं शुक्रवारी तडीस जातील.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  मिथुन (Gemini) :

  धैर्य आणि आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल. तुम्ही ठरवलेल्या योजनांमध्ये विश्वासाचा फायदा होईल. व्यवसायात उद्भवणाऱ्या समस्येचा निपटारा धैर्याने कराल. नोकरीत वेतनवाढ मिळू शकते.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  कर्क (Cancer) :

  तुमच्या सहकाऱ्यांमध्ये तुमची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक फायदे मिळवण्यासाठीचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय फायद्याचा ठरेल. बचतही होई शकते.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  सिंह (Leo) :

  तुम्हाला आज अनेक गूड न्यूज मिळतील. प्रयत्नांना यश मिळेल. कार्यालयात कौतुक होईल. कुटुंबाकडून सहकार्य लाभेल. नवीन काम तसेच नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  कन्या (Virgo) :

  तुमच्यापैकी काही जणांना कार्यक्षेत्रात बदल करण्याची संधी मिळेल. पण हे बदल पथ्यावर पडणार नाहीत. बदलासाठी हा योग्य काळ नाही. तुमच्या हातात जे काही आहे, ते टिकवून ठेवा. पूर्वी केलेल्या मेहनतीचं फल मिळेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  तूळ (Libra) :

  चिंता आणि अस्थिर विचार वाढील लागतील. ज्यामुळे निर्णय घेण्यात अडचण होईल. उत्पन्न चांगलं होईल. काहीच न करता किंवा थोड्याच प्रयत्नात धनलाभ होईल. भाग्य तुमच्यासोबत असेल. नवीन कार्याबाबत सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आहे. रेंगाळलेले काम मार्गी लागेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  वृश्चिक (Scorpio) :

  आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. कार्यालयात करत असलेल्या भविष्कालीन कामाचं येत्या काही दिवसात फल मिळेल. प्रगती होईल. कुटुंबातिल सर्व सदस्य आनंदी आणि समाधानी राहतील.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  धनु (Sagittarius) :

  दृढनिश्चयासह आणि पूर्ण समर्पणाने कामं करा. याचा परिणाम सकारात्मक होईल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने, त्याच्या समस्या जाणून घेतल्याने नात्यात आणखी दृढता येईल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मकर (Capricorn) :

  व्यवसायासंबधी काही समस्या संभवतील. मात्र उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात अनुकूलता राहिल. कौटुंबिक जीवनात सुख नांदेल. संतती किंवा प्रेम संबंधात येणारे अडथळे दूर होतील.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  कुंभ (Aquarius) :

  यावेळेस घेतलेले निर्णय योग्य आणि फायदेशीर ठरतील. नव्याने भागीदारी करण्यासाठी तसेच संस्थेत सहभागी होण्यासाठी योग्य वेळ आहे. यामुळे फायदा होईल. व्यापारी वर्ग महत्त्वाचे सौदे करु शकतात.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  मीन (Pisces) :

  रचनात्मकता शिगेला पोहचेल. लेखन, कला यासारख्या क्रिएटीव्ह क्षेत्रातील व्यक्तींना लोकप्रियता मिळू शकते. साहित्य, संगीत, टीव्ही, सिनेमा, फॅशन आणि संबंधित लोकांना आपल्यातील हुनर दाखवण्याची संधी मिळेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7